breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

PMपदाबाबत शरद पवारांचं मोठं विधान, विरोधकांच्या महाआघाडीसाठी तय्यार!

मुंबईः देशाच्या राजकारणात जेव्हा-जेव्हा तिसऱ्या आघाडीची चर्चा झालीय किंवा होते, तेव्हा पंतप्रधानपदासाठी एकच नाव पुढे येतं आणि ते म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार… २०१९च्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात विरोधकांची महाआघाडी करण्याच्या हालचालींना वेग आलेला असतानाही, ‘पवारसाहेब’ पंतप्रधान होऊ शकतात बरं, असं त्यांचे समर्थक हळूच सांगतात. परंतु, आपण पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नसल्याचं आज पवारांनी स्वतःच स्पष्ट केलं आहे.

२०१९च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालांनंतर पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर केला जाईल, अशी सावध खेळी काँग्रेसनं केली आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या गळ्यात पंतप्रधानपदाच्या उमेदवारीची माळ त्यांनी घातलेली नाही. निकालांनंतर पक्षीय बलाबल आणि जागांचं समीकरण मांडून पंतप्रधानपदाचा उमेदवार निश्चित केला जाणार आहे.  स्वाभाविकच, या पदाबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे आणि त्यात शरद पवार यांचं नावही आहेच. राष्ट्रीय राजकारणाचा दांडगा अनुभव आणि सर्वच पक्षांशी सलोख्याचे संबंध असल्यानं पवार हे पंतप्रधानपदाचे ‘पॉवरफुल्ल’ दावेदार मानले जातात. मात्र, पवारांनी वेगळंच मत मांडून आपल्या समर्थकांना काहीसं नाराज केलं आहे.

मी, यूपीए अध्यक्ष सोनिया गांधी आणि माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा मिळून विरोधकांची मोट बांधू शकतो, कारण आम्हालाही तिघांनाही पंतप्रधानपदाची इच्छा नाही, ते आमचं ध्येय नाही, अशी भूमिका शरद पवार यांनी ‘हिंदुस्थान टाइम्स’ या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत मांडली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button