breaking-newsराष्ट्रिय

4G डाउनलोड स्पीड : रिलायन्स जिओ सर्वात ‘स्लो’, ही कंपनी ठरली ‘बेस्ट’

भारतात जवळपास सर्वच दूरसंचार कंपन्या इंटरनेटची सेवा पुरवतात. मात्र, इंटरनेट स्पीडच्या बाबतीत सर्व कंपन्या अपयशी ठरतात किंवा त्यांच्या सेवेमधील उणीवा प्रकर्षाने जाणवतात. नुकत्याच प्रसीद्ध झालेल्या एका नव्या अहवालानुसार भारतात एअरटेल कंपनीकडून सर्वाधिक 4G डाउनलोड स्पीड पुरवला जातो अशी माहिती समोर आली आहे. याबाबतीत व्होडाफोन कंपनी दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर रिलायन्स जिओचा 4G डाउनलोड स्पीड सर्वात कमी असल्याचं या अहवालात म्हटलं आहे.

4G डाउनलोड स्पीडच्या बाबतीत एअरटेलने अव्वल क्रमांक गाठला आहे. तर सातत्यपूर्ण दर्जेदार नेटवर्क पुरवण्यामध्ये रिलायन्स जिओ पहिल्या क्रमांकावर आहे. व्हॉट्स अॅपसारखे अॅप वापरताना रिलायन्स जिओच्या स्पीडमध्ये कमालीचं सातत्य असतं, असंही या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. मात्र, केवळ 4G नेटवर्कचीच सेवा पुरवून देखील रिलायन्स जिओ कंपनी स्पीडच्या बाबतीत सर्वात स्लो आहे, असं या अहवालात स्पष्ट म्हटलं आहे.

मोबाइल गुणवत्ता मापक कंपनी Tutela ने याबाबतचा अहवाल जाहीर केला आहे. भारतात दूरसंचार सेवा देणाऱ्या सर्व कंपन्यांच्या सेवेची चाचपणी केल्यानंतर हा अहवाल जाहीर करण्यात आल्याचा दावा कंपनीने केला आहे.

दुसरीकडे, अपलोड स्पीडच्या बाबतीत व्होडाफोन आणि आयडिया कंपन्यांनी बाजी मारली आहे. आयडियाचा अपलोड स्पीड 4.7Mbps तर व्होडाफोनचा अपलोड स्पीड 4.5Mbps आहे. याशिवाय रिलायंस जिओचा अॅव्हरेज अपलोड स्पीड 3.8Mbps नोंदवण्यात आला आहे. विशेष म्हणजे ‘ट्राय’ने जानेवारी महिन्यात जारी केलेल्या अहवालात जिओ स्पीडमध्ये अव्वल असल्याचं म्हटलं आहे. एअरटेलपेक्षा जिओचा स्पीड दुपप्ट असल्याचं ट्रायच्या अहवालात म्हटलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button