breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

गजानन महाराज प्रगटदिनानिमित्त चिंचवडमध्ये भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रम

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – श्री गजानन महाराज (शेगांव) यांच्या 141 व्या प्रगटदिनानिमित्त तानाजीनगर, चिंचवड येथील श्री गजानन सत्संग मंडळाच्या वतीने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

मंगळवारी (दि.19) श्रींच्या पालखीची भव्य मिरवणूक गजानन महाराज मंदीर ते चिंचवडगाव परिसरातून काढण्यात आली. अश्वपुजन संस्थेचे अध्यक्ष विश्वनाथ धनवे व प्रताप भगत व पादुका पुजन अविनाश बारकांडे, गजानन खासनिस यांच्या हस्ते करण्यात आले. पालखी मार्गावर महिला भगिनींनी फुलांच्या पाकळ्यांची सुंदर रांगोळी घालून स्वागत केले. पालखीपुढे ध्वज पथक, बॅंड पथक, वारकरी पथक, भजनी मंडळ सहभागी झाले होते.

मंगळवारी पहाटे साडेपाच वाजता श्रींना उष्णोदक अभिषेक व अभ्यंगस्नान, श्रींच्या उत्सवमुर्तीचे पुजन व मंगलस्नान सोहळा सकाळी सात वाजता कलश पुजन आदी कार्यक्रम झाले. दुपारी तुळजाई व अशोका महिला भजनी मंडळ यांनी भजन सादर केले. झुंजार युवक मंडळ, शिवाजी उदय मंडळ, काकडे पार्क, केशवनगर शाळा, साईबाबा मंदीर, मारुती मंदीर, श्री मंगलमुर्ती वाडा, धनेश्वर मंदीर, श्री मोरया गोसावी समाधी मंदीर, गांधी पेठ, चापेकर चौक, पॉवर हाऊस चौक, लिंक रोड, कालीका माता मंदीर या पालखी मार्गावर शेकडो भक्तगणांनी पालखी दर्शन घेतले. सायंकाळी मंदीरात श्रींची महाआरती करण्यात आली.

या उत्सवात बुधवारी (दि. 20) व गुरुवारी (दि. 21) सायंकाळी सहा वाजता हभप केशव शिवडेकर (गोवा) यांचे किर्तन होणार आहे. तसेच, शुक्रवारी (दि. 22) सायंकाळी सहा वाजता डॉ. सजंय उपाध्ये (पुणे); शनिवारी (दि. 23) हभप प्रा. विलास गरवारे (सातारा); रविवार (दि. 24) पहाटे साडेपाच वाजता अखंड चोविस तास पारायण, सोमवारी (दि. 25) सकाळी नऊ वाजता हभप अनंत महाराज शास्त्री दैठणकर (परभणी) यांचे किर्तन. दुपारी पावनेबारा वाजता श्रींची प्रगटवेळ व गजर, दुपारी बारा वाजता श्रींची महाआरती नंतर सायंकाळी पाचपर्यंत महाप्रसाद, रात्री साडेदहा वाजता पसायदानाने महोत्सवाची सांगता होणार आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button