breaking-newsमनोरंजन

शीतली-अज्याच्या घरी येणार नवीन पाहुणा !

मुंबई : ‘लाखात एक आपला फौजी’ असं म्हणायला लावणारी ‘लागीरं झालं जी’ मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे. सध्या मालिका एका रंजक वळणारवर आली आहे. शीतल आणि अजिंकच्या आयुष्यात आता एक नवीन पाहुणा येणार आहे. त्यामुळे आपण ‘बाबा’ होणार असल्याचे कळताच अजिंक्यचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.

सध्या मालिकेत अजिंक्यच्या हाताला दुखापत झाल्यामुळे त्याच्यावर उपचार सुरु आहेत आणि तो कामावर रुजू झालेला नाही. घरातील लोकांच्या मते अजिंक्यने पुन्हा आर्मीत रुजू होऊ नये, असं त्यांना वाटतंय. पण सगळ्यांचा विरोध पत्करून अजिंक्य आणि शीतल दोघेही आर्मीत पुन्हा रुजू होण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत.

मालिकेत अजून एक रंजक वळण म्हणजे शीतल आणि अजिंक्य यांच्या आयुष्यात नवीन पाहुणा येणार आहे. हि आनंदाची बातमी त्या दोघांनी घरी कोणालाच सांगितली नाही आहे. हि बातमी ऐकून घरचे अजिंक्यला कामावर रुजू होऊ देणार नाहीत, म्हणून शीतलने घरी कोणालाच हे सांगितलं नाही आहे. पण हि बातमी ऐकून अजिंक्य मात्र खूपच खुश आहे आणि तो शीतलला काहीच काम करू देत नाही आहे. हि आनंदाची बातमी घरी कळल्यावर घरच्यांची काय प्रतिक्रिया असेल हे मात्र प्रेक्षकांना येत्या काही भागात पाहायला मिळणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button