breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

शिक्षणमंत्र्याच्या उपस्थितीसाठी शिक्षक दिनाचे कार्यक्रम ढकलले पुढे

– शिक्षण समिती सभापतींचा हट्टाहास

पिंपरी ( महा ई न्यूज ) – देशाचे राष्ट्रपती डॅा.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन हा शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. मात्र, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शिक्षण समितीने राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची गुणवंत शिक्षकांचे पुरस्कार वितरणास तारीख न मिळाल्याने शिक्षक दिनाचे सर्व कार्यक्रम पुढे ढकलले आहेत. दरम्यान, शिक्षण विभागातील अधिका-यांच्या हलगर्जीपणामुळे शिक्षक दिन साजरा होणार नसल्याने त्याचा राष्ट्रवादी कॅाग्रेस व शिवसेना नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर यांना विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी पत्र दिले आहे. त्यात म्हटले आहे की, डॉ. राधाकृष्णन यांचा ५ सप्टेंबर हा जन्मदिन देशभरात शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. गुरु व शिष्याचे हे नाते अधिक प्रगल्भ होण्यासाठी आणि वर्षभर केलेल्या ज्ञानदानचे उतराई होण्यासाठी शिक्षकांच्या कौतुक म्हणून ह्या दिवशी शिक्षक दिन मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. गेल्या वर्षभरात ज्या शिक्षकांनी मेहनत घेऊन विद्यार्थी घडविण्याचे कार्य शिक्षकवृंद करीत असतात. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील प्राथमिक, माध्यमिक शाळेत साजरा केला जातो. तसेच गुणवंत शिक्षकांना या दिवशी सन्मानित केले जाते. याशिवाय आदर्श शाळेचा सुध्दा सत्कार करण्यात येतो.

दरम्यान, उद्या (बुधवारी) शिक्षक दिन असूनही मनपातील शिक्षण विभागामार्फत कुठल्याही कार्यक्रमाचे नियोजन केलेले नाही. त्यामुळे परपंरनुसार साजरा होणा-या शिक्षक दिन शिक्षण विभागातील जबाबदार अधिका-यांच्या हलगर्जीपणामुळे रद्द करण्यात आलेला आहे. सत्ताधारी भाजपच्या पदाधिका-यांच्या दुर्लक्षामुळेच हा प्रकार घडला आहे. यामुळे सत्ताधारी भाजपचे पदाधिकारीही तेवढेच जबाबदार आहेत. याबाबत राष्ट्रवादी कॉग्रेस व शिवसेना पक्षामार्फत जाहीर निषेध करतो, शिक्षक दिन साजरा न करणा-या संबधितांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते दत्ता साने, नगरसेविक विनया तापकीर, आश्विनी चिंचवडे, नगरसेवक राजू बनसोडे यांनी केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button