breaking-newsTOP Newsपुणेमहाराष्ट्र

पुण्यातील मानाच्या 5 गणपतीची अशी होणार प्रतिष्ठापना, पहा वेळापत्रक

पुणे | महाईन्यूज | प्रतिनिधी

राज्याची सांस्कृतिक नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यामध्ये कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावामुळे जीवनमान ठप्प झाले आहे. त्याचा परिणाम यंदाच्या गणेशोत्सवावर झाला आहे. सर्व खबरदारी घेऊन मानाच्या 5 गणपतीची शांततापूर्ण प्रतिष्ठापना होणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या सार्वजनिक गणेशोत्सवात नागरिकांना सहभागी होता येणार नाही. तसे, आदेश राज्य सरकारने दिले असले तरी धावत का होईने गणरायाचे दर्शन घेण्यासाठी दगडूशेठ समोर गर्दी झालेली पहायला मिळत आहे.

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांचा उत्सव मोठा करता येणार नाही, म्हणून हिरमोड झाला आहे. पण कोरोना संकटाचे गांभीर्य सर्वांनी मान्य केले आहे. यंदाच्या गणेशोत्सवातल्या नसलेल्या रांगोळ्यांचे गालीचे, मिरवणुकीचे ढोल आणि नटून थटून वाजत गाजत बाप्पाला न्यायला येणारी भक्ताची रीघ याशिवायचा गणेशोत्सव सुना सुना आहे.

पुण्यातील मानाच्या 5 गणपतीची प्रतिष्ठापना होत आहे. कोणताही गाजावाजा, गर्दी टाळून प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, यंदा एकमेकांच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रतिष्ठापना होणार आहे.

मानाचे 5 गणपती प्रतिष्ठापना

1  -ग्रामदैवत कसबा

वेळ 11 वाजून 40 मिनिटं

हस्ते-दगडूशेठ गणपती उत्सव प्रमुख हेमंत रासने

2 -ग्रामदेवता तांबडी जोगेश्वरी

वेळ 11 वाजता, हस्ते अखिल मंडई गणपती मंडळ अध्यक्ष अण्णा थोरात यांच्या हस्ते

3 -गुरुजी तालीम

वेळ 12 वाजून 15 मिनिटं

भाऊ रंगारी मंडळाचे प्रमुख पुनीत बालन यांच्या हस्ते

4- तुळशीबाग

वेळ 11.30 हस्ते केसरी वाडा गणपतीचे विश्वस्त दीपक टिळक यांच्या हस्ते

5-केसरीवाडा

वेळ 10 वाजता

– केसरीचे विश्वस्त रोहित आणि प्रणती टिळक यांच्या हस्ते स्थापना करणार आहे. तर आरती तुळशीबाग गणपती पदाधिकारी यांच्या हस्ते होणार आहे.

मानाचे गणपती व्यतिरिक्त लोकप्रिय गणपती यांच्या गणेशाची  स्थापनाही होणार आहे.

दगडूशेठ

– वेळ 11 वाजून 10 मिनिटं

– हस्ते कसबा गणपती अध्यक्ष श्रीकांत शेटे यांच्या हस्ते

– अखिल मंडई

दुपारी 12 वाजता

हस्ते- तांबडी जोगेश्वरी मंडळ अध्यक्ष राजाभाऊ टिकार यांच्या हस्ते

– भाऊसाहेब रंगारी

10 वाजता

गुरुजी तालीम मंडळ अध्यक्ष प्रवीण परदेशी यांच्या हस्ते

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button