breaking-newsपिंपरी / चिंचवड

डुक्कर पाळणा-यावर मालकांवर महापालिका फाैजदारी दाखल करणार

पिंपरी ( महा ई न्यूज ) – महापालिका हद्दीमध्ये डुक्कर पालन करणाऱ्या मालकांनी स्वताःची डुकरे पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीबाहेर सात दिवसाच्या आत सोडावित, अन्यथा  संबंधित मालकांवर कायदेशीर कारवाई करून फौजदारी गुन्हे दाखल करावे, असा आदेश महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाने दिला आहे.

पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीमध्ये डुकरांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. सोमवारी शिवसेनेचे नगरसेवक सचिन भोसले यांनी एक जिवंत डुक्कर पालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय यांच्या पालिका मुख्यालयातील कार्यालयात आणून सोडले. त्यामुळे खडबडून जागे झालेल्या पालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाने त्वरित प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे.

वराहपालन करणाऱ्या मालकांनी आपली डुकरे मनपा हद्दीच्या बाहेर सात दिवसांच्या आत त्वरित हलवावीत अन्यथा संबंधित मालकांवर कायदेशीर कारवाई करून फौजदारी गुन्हे दाखल केले जातील असा इशारा या प्रसिद्धिपत्रकामधून देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे महापालिकेच्या स्वछताविषयक तरतुदीनुसार या डुकरांना अटकाव करून ती नष्ट करण्यात येतील तसेच डुकरांच्या प्रेतांची विल्हेवाट महापालिकेमार्फत लावली जाईल. डुकराबद्दलच्या नुकसानभरपाई बाबत दावा दाखल करता येणार नाही असे महापालिकेने कळविले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button