breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

वायसीएम रुग्णालयात स्वाईन फ्लू विशेष कक्ष सुरू करा, शिवसेनेची मागणी

शिवसेनेतर्फे वैद्यकीय विभागाला निवेदन

 पिंपरी – स्वाईन फ्लू आजार फोफावत चालल्याने रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. याबाबत नागरिकांत जनजागृती होण्यासाठी महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात विशेष स्वाईन फ्लू कक्ष सुरू करण्यात यावा, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने महापालिकेच्या वैद्यकीय प्रशासनाकडे करण्यात आली आहे.

 

यासंदर्भात शिवसेनेचे पिंपरी विधानसभा शहर संघटक जितेंद्र ननावरे यांनी वैद्यकीय विभागाचे औरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रविण साळवे यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, सध्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये स्वाईन फ्लूचा धोका वाढला आहे. याबाबत महापालिका प्रशासनाकडून कोणतीही ठोस उपाय योजना होत नाही. यामुळे रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. या ऑगस्ट महिन्यातच आठ रुग्ण दगावल्याने शहरामध्ये अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. या आजाराचे अनेक रुग्ण वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार घेत आहेत.

 

मागील वर्षी स्वाईन फ्लूने 61 रुग्ण दगावले होते. जानेवारी २०१८ ते जुलै अखेरपर्यंत फक्त एक रुग्ण दगावला होता. परंतु, ऑगस्ट महिन्याच्या पंधरा दिवसाच्या कालखंडात तब्बल आठ रुग्ण दगावल्याने परिस्थिती हालाखीची होत चालली आहे. प्रशासनाने होर्डिंग, परिपत्रक, जनहितार्थ प्रबोधन, शालेय स्तरावर जनजागृती करणे व शहराच्या लोकसंख्येच्या दृष्टीने टॅमी फ्लूच्या गोळ्यांचा योग्य मुबलक साठा करून ठेवणे गरजेचे आहे. ऑगस्ट महिन्यात केवळ १५ दिवसांत आठ रुग्णांचा बळी गेल्याने प्रशासन अजूनही ठोस उपाय योजना करत नसल्याचे दिसते. स्वाईन फ्लूची माहिती नागरिकांना समजून सांगण्यासाठी वायसीएम रुग्णालयात विशेष कक्ष तातडीने सुरु करावा, अशी मागणी ननावरे यांनी केली आहे.

 

यावेळी पिंपरी विधानसभा शिवसेना शहर संघटक जितेंद्र ननावरे, समन्वयक किरण मोटे, विभाग प्रमुख राजेश वाबळे, रवींद्र ओव्हाळ, शरण शिंगे, मनोज मातंग, राहुल कांबळे, गणेश झाडे इत्यादी उपस्थित होते.

 

 

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button