breaking-newsराष्ट्रिय

रागाच्या भरात पॉवर बँक जमिनीवर आदळल्याने झाला स्फोट, महिलेला अटक

दिल्लीमधील इंदिरा गांधी अंतरराष्ट्रीय विमानतळावर पॉवर बँकचा स्फोट झाल्याने एकच खळबळ माजली. एका महिलेने पॉवर बँक लगेजच्या बँगमध्ये ठेवली असल्याने तिला ती पॉवर बँक काढून केबिन बँकमध्ये ठेवण्यास सांगण्यात आले. त्यामुळे संतापलेल्या महिलेने ती पॉवर बँक जोरात जमीनीवर फेकल्याने तिचा स्फोट झाला.

दिल्ली येथील डिफेन्स कॉलिनीमध्ये राहणाऱ्या ५६ वर्षीय मालविका तिवारी या धर्मशाला येथे जाण्यासाठी निघाल्या होत्या. विमानतळावर पोहचल्यानंतर चेकइनच्या वेळी त्यांच्या बॅगमध्ये पॉवर बँक अढळली. सुरक्षारक्षकांनी त्यांना पॉवर बँक केबिन बॅगमध्ये ठेवण्याची विनंती केली. त्यावेळी संतपालेल्या मालविका यांनी बॅगमधील पॉवर बँक काढून ती जोरात जमिनीवर आदळी आणि पॉवर बँकचा स्फोट झाला. स्फोटाचा आवज ऐकल्यानंतर सीआयएसएफच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत पॉवर बँकला लागलेली आग विझवून मालविका यांना ताब्यात घेतले. चौकशी केल्यानंतर झालेला प्रकार लक्षात आल्याने जवानांनी मालिविका यांना दिल्ली पोलिसांच्या ताब्यात दिले. दिल्ली पोलिसांनी मालविका यांना आयपीसी सेक्शन ३३६ ( सार्वजनिक ठिकाणी लोकांच्या जिवीताला धोका पोहचवणे) आणि आयपीसी सेक्शन २८५ (ज्वलनशील पदार्थ अयोग्य पद्धतीने हाताळणे) या गुन्ह्यांखाली अटक केली आहे. कोर्टासमोर मालविका यांना हजर करण्यात आल्यानंतर जामिनावर त्यांची सुटका करण्यात आली आहे.

विमानाने प्रवास करताना पॉवर बँकसारख्या इलेक्ट्रीक वस्तू चेक-इनच्या बॅगमध्ये घेऊन जाण्याची परवाणगी नसते. जवळजवळ सर्वच विमानकंपन्या आपल्या तिकीटांवरील सुचनांमध्ये यासंदर्भात स्पष्टपणे माहिती देतात. तरीही अनेकदा शेवटच्या क्षणी अनेक प्रवासी आपली पॉवर बँक मोठ्या बँगांमध्ये ठेवतात आणि त्यावरून सुरक्षारक्षकांशी हुज्जत घालतात. मालविका यांनाही अशाप्रकारे हुज्जत घालणे आणि रागाच्या भरात पॉवर बँक आपटणे चांगलेच महागात पडले असेच म्हणावे लागेल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button