breaking-newsमुंबई

विद्याविहार स्टेशनजवळ विटांनी भरलेला ट्रक उलटला

मुंबईतील विद्याविहार स्टेशनजवळ शुक्रवारी दुपारी विटांनी भरलेला ट्रक उलटल्याची घटना घडली. विटांच्या ढिगाऱ्याखाली पाच ते सहा मजूर अडकले असून त्यांना बाहेर काढण्याचे काम सुरु आहे. अग्निशमन दल व अन्य आपातकालीन यंत्रणा घटनास्थळी पोहोचल्या आहेत.

विद्याविहार स्टेशन परिसरात प्लॅटफॉर्म क्रमांक एकजवळ दुपारी विटांनी भरलेला ट्रक उलटला. ट्रकचा टायर फुटल्याने ही दुर्घटना घडल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. विटांच्या ढिगाऱ्याखाली मजूर अडकले असून यातील दोघांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले आहे. त्या दोघांना घाटकोपरमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. या दुर्घटनेमुळे विद्याविहार पुलावरुन येणाऱ्या प्रवाशांची गर्दी झाली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button