breaking-newsपुणेमहाराष्ट्र

लग्न सुधारणा आचारसंहितेची सोशल चळवळ

तरुणाईकडून प्रतिसाद : लग्नातील अनाठायी खर्च टाळण्याचे आवाहन
पुणे- लग्नात अनाठायी खर्च करणार नाही, जो काही खर्च होईल तो वधू-वर निम्मा निम्मा करू, लग्न नोंदणी पध्दतीनेच करू, लग्नाच्या निमित्ताने सामाजिक संस्थांना दान करू अशी आचारसंहिता वधू व वरांकडून केली जात आहे. लग्न सुधारणा आचारसंहितेची सोशल चळवळ आता चांगलीच जोम धरू लागली आहे.

सोशल मिडियाच्या माध्यमातून आम्ही जास्तीत जास्त तरुणाईपर्यंत ही लग्नाची आचारसंहिता घेऊन पोहोचण्याचे धैय ठेवले आहे. त्यामध्ये आम्ही प्रत्येकाने किमान अशी पाच माणसे जोडावीत जी ही आचारसंहिता पाळतील. तशी प्रतिज्ञापत्रही आम्हाला पाठवतील. याबरोबरच आम्ही येत्या काळात अनेक महाविद्यालयांमध्ये जात याबाबत प्रबोधन करणार आहोत.
– हेरंब कुलकर्णी, शिक्षणतज्ज्ञ

एखाद्या निवडणुकीपुर्वी त्या निवडणुकीसाठीच आचारसंहिता जाहीर केली जाते. त्यामध्ये निवडणूकपूर्व व निवडणुकीच्या कालावधीत उमेदवार तसेच कार्यकर्त्यांनी कशा प्रकारे कामकाज पार पाडावे याचे काही नियम घालून दिलेले असतात. या आचारसंहितेचा भंग केला तर उमेदवाराची उमेदवारीही रद्द होऊ शकते. त्याचप्रमाणे आता लग्नाचीही आचासंहिता जाहीर करण्याची नवी पध्दत सोशल मिडियाच्या माध्यमातून जम पकडत आहे.

शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी व सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब मालूंजकर यांनी केलेल्या सामाजिक आवाहनातून या चळवळीला पाठबळ मिळत आहे. आतापर्यंत तीन तरुणांनी आपल्या लग्नाची आचारसंहिता जाहीर केली आहे. यामध्ये लग्नात चुकीच्या प्रथांना खतपाणी घालणार नाही, राजकीय व्यक्‍तींना अनावश्‍यक महत्त्व दिले जाणार नाही, कोणताही बडेजाव, हुंडा आदी प्रकार करणार नाही, जेवणात कमी पदार्थ ठेवत त्याची नासाडी होणार नाही याची काळजी घेईन, लग्नपत्रिका शक्‍यतो समाज माध्यमातूनच छापेन अशा प्रकारची आचार संहिता तरुण स्वत:हून तयार करत आहेत. यामध्ये चुकीच्या अनिष्ट प्रथांना फाटा देत सांविधानिक पध्दतीने विवाहबध्द होण्याचा हेतू असल्याचे हेरंब कुलकर्णी सांगतात.

कुलकर्णी म्हणाले, लग्न साधेपणाने करण्याबाबत तरुणांनी पुढाकार घेतला तरच लग्नाला आलेले बाजारु स्वरुप थांबविण्यास मदत होईल. तसेच चुकीच्या रुढी परंपरा पुढच्या पिढीपर्यंत जाणार नाहीत यासाठी आम्ही तरुणांना आचारसंहिता पाळणार असल्याचे प्रतिज्ञापत्र 8208589195 या क्रमांकावर पाठविण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार आतापर्यंत तीन जणांनी मला हमीपत्र भरुन पाठविले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button