breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

कोरोना प्रतिबंधक लस घेतल्याने २१ आजारांपासून संरक्षण मिळते – WHO

नवी दिल्ली | प्रतिनिधी 
जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूपासून संरक्षण होण्यासाठी सध्या जगभरात लसीकरणावर भर दिला जात आहे. याच कोरोना प्रतिबंधक लसीसंदर्भात एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. कोरोना लसीमुळे केवळ कोरोनापासूनच नव्हे, तर इतर २१ आजारांपासूनही संरक्षण होते, अशी माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे.

कोरोना लसीमुळे कोविड-१९ विषाणूपासून लढण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती मिळते. त्यामुळे जगभरातील प्रत्येक देशातील सरकार नागरिकांचे लसीकरण करण्यावर अधिक भर देत आहे. त्यातच आता जागतिक आरोग्य संघटनेने लसीकरणाचे फायदे सांगितले आहेत. कोरोना प्रतिबंधक लसीमुळे कोरोनासह इतर २१ आजारांपासून संरक्षण मिळते. लस घेतल्यामुळे संरक्षण होणाऱ्या वीसहून अधिक आजारांची यादी व्हॅक्सिन वर्क या हॅशटॅगसह जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केली आहे. त्यामुळे लस घेण्यास घाबरु नका, कोणतेही गैरसमज बाळगू नका आणि लवकरात लवकर लसीकरण करावे, असे आवाहन जागतिक आहे. कोरोना प्रतिबंधक लसीमुळे २१ आजारांपासून संरक्षण होते. त्यामध्ये हेपॅटायटस बी, गोवर, कांजण्या, रुबेला, गर्भाशयाचा कर्करोग , पटकी/कॉलरा, घटसर्प, इबोला, इन्फ्लुएंझा, जपानी एन्सेफलायटीस, मेंदुज्वर, गालगुंड, डांग्या खोकला, फुफ्फुसाचा दाह किंवा न्यूमोनिया, पोलिओ, रेबिज, रोटा व्हायरस, धनुर्वात, विषमज्वर, पीतज्वर, आदी आजारांचा समावेश आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button