breaking-newsराष्ट्रिय

येडियुरप्पा देशातील सर्वात कमी कालावधीचे मुख्यमंत्री

बंगळुरु : कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणारे बी एस येडियुरप्पा हे भारताच्या इतिहासातील सर्वात कमी कालावधीसाठी मुख्यमंत्रिपद भूषवणारे नेते ठरले आहेत. येडियुरप्पा हे 55 तासांसाठी कर्नाटकचे मुख्यमंत्री होते. येडियुरप्पा यांनी 17 मे 2018 रोजी सकाळी 9 वाजता कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर 19 मे 2018 रोजी त्यांनी कर्नाटकात बहुमत सिद्ध करण्यापूर्वी पदाचा राजीनामा दिला.

मोठ्या नाट्यमय घडामोडीनंतर अवघ्या 55 तासात कर्नाटकातील भाजपचे सरकार पडले. बहुमत सिद्ध करण्यापूर्वीच मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा यांनी राजीनामा दिला. त्यामुळे कर्नाटकात काँग्रेस आणि जेडीएसचं सरकार सत्तेवर येणार आहे.  यापूर्वी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री जगदंबिका पाल हे सर्वात कमी कालावधीसाठी मुख्यमंत्री ठरले होते. जगदंबिका पाल यांनी 21 फेब्रुवारी 1998 ते 23 फेब्रुवारी 1998 असे तीन दिवस यूपीचं मुख्यमंत्रिपद भूषवले होते.

यूपीचे तत्कालीन राज्यपाल रोमेश भंडारी यांनी कल्याण सिंग यांचे सरकार बरखास्त केले होते. कल्याण सिंग हे उत्तर प्रदेशातील भाजपचे पहिले मुख्यमंत्री होते. त्यानंतर राज्यपालांनी जगदंबिका पाल यांना सत्तास्थापनेचे निमंत्रण दिले. मात्र अलाहाबाद कोर्टाने कल्याण सिंग सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले. कल्याण सिंग यांनी सदनात यशस्वीपणे बहुमत सिद्ध केलं आणि पुन्हा मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button