breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

मोबाईल फोन वाचवण्यासाठी चोराच्या मागे धावला अन् ICU मध्ये पोहचला

मुंबईमधील बोरीवली रेल्वे स्थानकामध्ये मोबाईल वाचवण्याचा नादात एक तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. संबंधित प्रकार १६ जानेवारी रोजी रात्री सव्वा दहाच्या सुमारास घडला असला तरी त्याचे सीसीटीव्ही फुटेज आत्ता समोर आले आहेत.

मुंबईहून सुरतला जाणाऱ्या एका गुजराती कुटुंबामधील दोन सदस्य गाडी उशीरा असल्याने ६-७ क्रमांकाच्या प्लॅटफॉर्मवर उभे होते. दोघेही आपआपल्या मोबाईलवर व्यस्त होते. अचानक त्या दोघांसमोर काळ्या रंगाचे कपडे घातलेला एक मुलगा आला आणि त्याने या दोघांच्या हातातील मोबाईल खेचून घेत समोरच्या ट्रॅकवर उडी मारली. काय घडले हे समजण्याआधीच या गुजराती कुटुंबातील काका-पुतण्याच्या हातातील दोन्ही मोबाईल घेऊन चोराने पळ काढला होता. या दोघांपैकी पांढऱ्या रंगाच्या कपड्यात असणाऱ्या पुतण्याने त्या चोराचा पाठलाग करण्यासाठी रेल्वे ट्रॅकवर उडी मारली. मात्र त्यावेळी त्याच ट्रॅकवर दहिसरवरून बोरीवलीला जाणारी लोकल ट्रेन येत असल्याचे त्याच्या लक्षात न आल्याने ट्रेनचा धक्का त्या लागला. ट्रेनखाली येण्यापासून तो थोडक्यात बचावला पण यामध्ये त्याला दुखापत झाली. तरी त्याने मोबाईल चोराला पकडून ठेवले. मात्र लोकल ट्रेन निघून जाईपर्यंत इतर कोणीही त्याच्या मदतीला न आल्याने चोर पळून जाण्यात यशस्वी ठरला.

लोकल ट्रेन निघून गेल्यानंतर पलीकडच्या प्लॅटफॉर्मवरील लोकांना हा तरुण रक्ताच्या थारोळ्यामध्ये जखमी अवस्थेत पडलेला दिसला. त्याला इतरांनी प्लॅटफॉर्मवर उचलून आणले आणि नंतर रुग्णालयात भरती केले. तो सध्या आयसीयुमध्ये दाखल असून त्याची प्रकृती नाजूक असल्याचे समजते. याप्रकरणी बोरीवली रेल्वे पोलिसांनी आरोपी आणि त्याच्या एका साथीदाराला अटक केली आहे. आरोपींची नाव अर्शद शेख आणि प्रवेश शेख अशी आहेत. दोघेही मीरारोड येथील नया नगरमधील रहिवाशी आहे. या दोघांविरोधात मुंबईतील काही पोलीस स्थानकांमध्ये गुन्हे दाखल आहेत. या दोघांना चोरी आणि हत्येचा प्रयत्न या गुन्ह्यांखाली अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button