breaking-newsपुणेमहाराष्ट्र

पती, त्याच्या प्रेयसीसह चौघांना पोलीस कोठडी

  • प्रेयसीबरोबर विवाह करण्यासाठी अडथळा नको म्हणून केली हत्या
    – पत्नी, आठ महिन्याच्या मुलाचा खून

पुणे – प्रेयसीबरोबर विवाह करण्यासाठी अडथळा नको म्हणून पत्नीसह आठ महिन्याच्या बाळाचा खून केल्याप्रकरणी पती, त्याच्या प्रेयसीसह चौघांना 18 जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. व्ही. थोडगे यांनी दिला आहे.
पती दत्ता वसंत भोंडवे (वय 30, रा. दारुंब्रे, ता. मावळ, जि. पुणे), प्रशांत जनगन भोर (वय 25, रा. माण रोड हिंजवडी, मुळ रा. इगतपुरी), पवन नारायण जाधव (वय 21, रा. हिंजवडी) आणि प्रेयसी सोनाली बाळासाहेब जावळे (वय 25, रा. आदर्श कॉलनी वाकड, मुळ रा. पाथर्डी, अहमदनगर) अशी पोलीस कोठडी झालेल्यांची नावे आहेत. नासीर उल (रा. पश्‍चिम बंगाल) याचा पोलीस शोध घेत आहेत. अश्‍विनी (वय 25) आणि त्यांचा आठ महिन्याचा मुलगा अनुज यांचा खून करण्यात आला होता.

शनिवारी (9 जून) रात्री दहाच्या सुमारास मुळशी तालुक्‍यातील जांबे गावच्या पुढे नेरे गावच्या दिशेला कोयतेवस्ती जवळ ही घडली होती. लुटीसाठी कोणी अज्ञातांनी आपल्यावर हल्ला करून पत्नी, बाळाचा खून केला. तसेच जवळचे पन्नास हजारही पळवून नेल्याचे आरोपी पती दत्ता भोंडवे यांनी पोलिसांना सांगितले होते. तसेच स्वत:वर वार झाल्याचे भासवून रुग्णालयातही दाखल झाला होता. मात्र, बोलण्यातील विसंगतीतून तो बारा तासांच्या आत पोलिसांच्या जाळ्यात सापडला. सोनाली ही भोंडवे याची प्रेयसी आहे. लग्नात अडथला ठरत असल्याने दोघांनी मिळून अश्‍विनीच्या हत्येचा कट रचला. अनूज आणि अश्‍विनी यांना क्‍लोरोफॉमचा वास देवून आणि नंतर गळा आवळून मारल्याचे तपासातून पुढे येते. पोलिसांनी आतापर्यंत 2 लाख 99 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी आणि पुढील तपासासाठी अटक केलेल्या चौघांना पोलीस कोठडी देण्याची मागणी सहायक सरकारी वकील ऍड. प्रभाकर तरंगे यांनी केली होती. त्यानुसार न्यायालयाने चौघांना 18 जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button