breaking-newsUncategorizedताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
मंत्रीपदासाठी नव्हे, तर वडीलांच्या स्वप्नपुर्तीसाठी राजकारणात – पंकजा मुंडे
– भोसरीत इंद्रायणीथडी जत्रेचे उद्रघाटन
पिंपरी ( महा ई न्यूज ) – राजकारणात मी मंत्री पदासाठी आलेली नाही. तर माझ्या वडीलांचे अधुरे स्वप्न पुर्ण करायचे आहे. समाजातील वंचित घटकांसह सर्वसामान्य कुटूंबातील नागरिकांचा विकास करायचा आहे, असे प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री पंकजा मुडे यांनी केले.
भोसरीतील शिवाजंली सखी मंच व महेशदादा स्पोटर्स फाउंडेशन आयोजित इंद्रायणीथडी जत्रेच्या उद्रघाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी भाजप शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे, पुजा लांडगे, महापाैर राहूल जाधव, प्राधिकरण अध्यक्ष सदाशिव खाडे, माजी महापाैर नितीन काळजे, स्थायी सभापती ममता गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
मुंडे म्हणाल्या की, 70 वर्षांत काॅंग्रेसने काहीच कामे केलेली नाहीत. तर राज्यात राष्ट्रवादी-कॉंग्रेसने स्वताःची घरे भरुन आपल्या वारसदारांचा विकास साधला आहे. मात्र, भाजप सरकारने घराघरात उज्ज्वला योजना, घरोघरी शौचालय, सौभाग्य योजनेतून घर तेथे वीज, बेघरांना घर देण्याचा उपक्रम पंतप्रधान मोदी यांनी राबवून देशाचा विकास केला आहे. पूजा लांडगे यांनी राजमाता जिजाऊ, झाशीची राणी लक्ष्मीबाई, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, रमाबाई आंबेडकर यांच्या नावे महिलांना दिलेले पुरस्कार कौतुकास्पद आहेत.
यावेळी पंकजा मुंडे यांच्या हस्ते सहाय्यक पोलिस आयुक्त निलम जाधव, डॉ. तुप्ती देसाई, डॉ. सुजाता गायकवाड, ॲड. कविता स्वामी, सुमनताई पवळे, मंदाकिनी ठाकरे, सुखदेवी नाटेकर, गिरीजा लांडगे, विद्या पाटील, ओवी सातपुते, सुरेखा सुकाळे, सत्यभामा देशमाने, ज्योती पठाणीया, शुभांगी शिंदे, सारिका पवार, पूनम गोसावी, जोत्स्ना कासार, राजश्री घागरे, यशोदा पवार, स्मिता काळे, नेत्रा तेंडुलकर, अंकिता नगरकर, रत्ना पाटील, सुमन सहाणे, पुष्पा ढगे, ब्रम्हाकुमारी करुणा बहनजी, निलिमा साकोरे, सविता साळुंखे, अक्षता पाताडे, यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.