breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

किमान क्षेत्रीय कार्यालयातील अधिकाऱ्यांना तरी जागेवरून हटवू नका; नगरसेवकांची धावाधाव!

पिंपरी | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील स्थापत्य, विद्युत, आरोग्य विभागातील अधिका-यांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या त्यामध्ये 44 अधिका-यांचा समावेश आहे. याबाबतचे आदेश आयुक्त राजेश पाटील यांनी काढल्यानंतर आता पालिकेतील काही पदाधिकारी, नगरसेवक बदली झालेल्या अधिकाऱ्यांचा बदली आदेश मागे घ्यावा यासाठी आयुक्तांची मनधरणी करीत आहेत. आगामी महापालीका निवडणुकीसाठी सहा महिने शिल्लक आहे. त्यामुळे किमान क्षेत्रीय कार्यालयातील अधिकाऱ्यांना तरी जागेवरून हटवू नका, अशी आर्जव आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे करण्यात येत असून आता आयुक्त काय भूमिका घेतात. याबाबदल पालिका वर्तुळात कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाला हाताशी धरून शहरातील एका आमदाराशी संबंधित (निकटवर्ती) कंपनीला काम मिळावे, यासाठी पायघड्या घातल्या जात आहेत. तब्बल १२२ कोटी रुपयांचे काम असलेल्या या निविदा प्रणालीच्या अटीशर्तींमध्ये मोठा बदल करण्याचा डाव आहे. विशेष म्हणजे, हा ‘फेरबदल’ महापालिका प्रशासन आणि राजकीय हस्तकांच्या सूचनांनुसार केला जात आहे. याबाबत ‘महाईन्यूज’ ने रोखठोक भूमिका मांडली होती. ” ‘अमृत’मध्ये ‘विष’ कालवण्याचा प्रयत्न : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या १२२ कोटी रुपयांच्या निविदेत फेरबदल? “ अशा मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर वर्षानुवर्षे ठाण मांडलेल्या 3 सहशहर अभियंता, 8 कार्यकारी अभियंता, 29 उपअभियंता आणि 4 सहायक आरोग्य अधिकारी अशा 44 अधिका-यांचा समावेश आहे. याबाबतचे आदेश आयुक्त राजेश पाटील यांनी सुट्टीच्या दिवशी रविवारी काढलेत. अधिकारी, कर्मचा-यांनी 15 दिवसाच्या आत बदली ठिकाणी रुजू व्हावे. अन्यथा प्रशासकीय कारवाईचा इशारा आयुक्तांनी दिला आहे.

या आदेशानंतर वर्षानुवर्षे एकाच जागी ठाण मांडून असलेल्या अधिकार्‍यांमध्ये खळबळ उडाली.ठराविक ठिकाणी, ठराविक विभागात वर्षानुवर्षे काम केल्यामुळे या अधिकाऱ्यांची विभागात आणि विभागाच्या संबंधीत कामकाजात मक्तेदारी निर्माण झाली आहे.या अधिकाऱ्यांचे नगरसेवकांशी पदाधिकाऱ्यांशी असलेले लागेबांधे उघड गुपित आहे.
आगामी महापालिका निवडणुका केवळ सहा महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे शेवटच्या या सहा महिन्यात वॉर्डात रखडलेली कामे पूर्ण करून घेण्यावर नगरसेवकांचा भर असतो. वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेल्या आणि संधान साधलेल्या अधिकाऱ्यांकडून अशी कामे करून घेता येऊ शकतात. त्यामूळे या अधिकाऱ्यांचा बदली आदेश मागे घ्यावा यासाठी पक्षनेते नामदेव ढाके यांनी सोमवारी उशिरापर्यंत नगरसेवकांचे खेटे सुरू होते.अखेरीस पक्षनेत्यांनी आयुक्त राजेश पाटील यांची भेट घेतली.आणि अधिकाऱ्यांचा असा तडकाफडकी काढलेला बदली आदेश मागे घ्यावा. या बाबत आयुक्तांशी चर्चा केली. आगामी महापालीका निवडणुकीसाठी सहा महिने शिल्लक आहे त्यामुळे किमान क्षेत्रीय कार्यालयातील अधिकाऱ्यांना तरी जागेवरून हटवू नका अशी आर्जव नगरसेवकांची आहे. अनेक नगरसेवकांनी आपल्याकडे अशी मागणी केली असल्याचे त्यांनी आयुक्तांना सांगितले. आता आयुक्त सत्ताधारी पक्षाच्या या मागणीला कितपत गांभीर्याने घेतात आणि त्यांची भूमिका काय ठरतात याकडे पालिका वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button