breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

बूथ रचना सक्षमीकरणासाठी ‘लक्ष्मण जगताप’ अ‍ॅपचे लोकार्पण

पिंपरी – भारतीय जनता पार्टी शहराध्यक्ष तथा आमदार लक्ष्मण जगताप यांच्या संकल्पनेतून तयार झालेल्या ‘लक्ष्मण जगताप’ या मोबाइल अॅपचे रविवारी भाजप कार्यालयामध्ये लोकार्पण करण्यात आले.

पिंपरी चिंचवड शहरातील बूथ रचना सक्षमिकरणासाठी ‘लक्ष्मण जगताप’ अ‍ॅपची निर्मिती करण्यात आली आहे. अ‍ॅप निर्मितीमध्ये मुख्य योगदान शहर प्रवक्ते अमोल थोरात यांचे आहे.   अ‍ॅपमार्फत शहरातील ५० हजार घरांशी संपर्क साधला जाणार आहे. प्ले स्टोअर वरती ‘लक्ष्मण जगताप’ नावाने मोबाइल अॅप उपलब्ध करून देण्यात आले असून, अॅप डाउनलोड करून अॅपद्वारे मतदार यादीतील नाव शोधता येणार आहे. मृत, दुबार व स्थलांतरित मतदारांची नावे शोधता येणार आहेत. या कामासाठी शहरातील भाजप पदाधिकार्यांची नेमणूक करण्यात आली आहे, असे आमदार लक्ष्मण जगताप यांनी सांगीतले. यावेळी पक्षनेते एकनाथ पवार, शहर प्रवक्ते अमोल थोरात, माजी महापौर आर. एस. कुमार, मोरेश्वर शेडगे, मच्छिद्र तापकीर, राजेश सावंत, राजू दुर्गे व पदाधिकारी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button