breaking-newsताज्या घडामोडी

डिकसळ येथील शेतकऱ्यांनी 15 क्विंटल ज्वारी शासनास दिली दान

कोरोना विषाणू संसर्गच्या पार्श्वभूमीवर कोरोना संकटग्रस्त उपाययोजना अंतर्गत सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण व तहसीलदार जीवन बनसोडे यांनी मोहोळ तालुक्यातील (जि. सोलापूर) बहुभूधारक शेतकऱ्यांना ज्वारी दान करण्याचे आवाहन केले होते.

या आवाहनास प्रतिसाद देत डिकसळ येथील शेतकऱ्यांनी सुमारे १५ क्विंटल ज्वारी शासनास दान दिली आहे. गावातील विठ्ठल मंदिरात तहसीलदार जीवन बनसोडे यांच्याकडे ही ज्वारी सुपुर्द करण्यात आली आहे. लॉकडाऊनमुळे सर्व परिस्थिति जागच्या जागेवर थांबली. परराज्यातील कामगार, हातावर पोट असलेले नागरिक यांची उपासमार होवू नये म्हणून शासन त्यांची खाण्यापिण्याची सोय करत आहे.

सोलापूर जिल्ह्यात ज्वारीचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. कोरोना संकटग्रस्तासाठी कोरोना प्रतिबंधक उपाय योजना करण्याकामी ग्रामस्तरावर गठित करण्यात आलेल्या ग्राम स्तरीय समिती मार्फत गावातील इच्छुक बहुभूधारक शेतकऱ्यांना ज्वारी दान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. 

कोरोना विषाणू संचारबंदीचा सर्वांत जास्त फटका शेतकरी वर्गाला बसला आहे, त्याने कष्टाने पिकविलेले पीक मातीमोल होत आहे. मात्र या कठीण काळातही जगाचा पोशिंदा असलेल्या बळीराजास स्वतःच्या भाकरीपेक्षा कोरोना संकटग्रस्तांची भूक महत्वाची वाटत आहे. हेच ज्वारी दान मदतीवरुन अधोरेखित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button