breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘बीआरटी’ मार्गावर वाहतूकीस अडथळा ; नो पार्किंगमधील वाहनावर कारवाईची मागणी

पिंपरी ( महा ई न्यूज ) – शहरातील ‘बीआरटी’ मार्गाची वापरापूर्वीच वाट लागली आहेत. काळेवाडी ते देहू-आळंदी रस्ता येथील ‘बीआरटी’ मार्ग अजुन प्रतिक्षेत असून, त्यातच केएसबी चौक ते चिखली मार्गावरील ‘बीआरटी’ मार्गात सर्रासपणे वाहने पार्क करण्यात येतात. त्यामुळे या मार्गावर अनधिकृत वाहनतळ झाले आहे. बसेसच्या अपुरी संख्याअभावी हा मार्ग प्रतिक्षेत आहे.

पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील दुचाकींची संख्या व सातत्याने होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेता, सार्वजनिक वाहतूक सक्षम करण्यासाठी ‘पीएमपी’वतीने पुण्यातील दोन तर पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण पाच मार्गांवर बीआरटीएस सेवा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यात 3 मार्गावर बीआरटी सेवा सुरु असून, चिखली मार्गे जाणारा बीआरटी मार्ग प्रतिक्षेत आहे.

दोनच दिवसांपूर्वी काळेवाडी फाटा ते देहू-आळंदी रस्ता व बोपखेल-आळंदी या ‘बीआरटी’ मार्गांची नुकतीच महापौरांसहीत महापालिकेचे अधिकारी आणि पीएमपीएलच्या व्यवस्थापकाकडून पाहणी करण्यात आली होती. त्यानुसार या मार्गांवरील त्रुटी दूर करुन बस उपलब्ध करुन देण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे पुरेशा बस नसल्याने तो मार्ग सुरु होत नसल्याचे महापालिका सांगत आहेत.

‘बीआरटी’ची बहुतांश सर्व कामे पूर्ण झाली आहेत. मात्र, या रस्त्याचा वापर सध्या वाहनतळासाठी होत आहे. दिवसेंदिवस येथे अवजड वाहने पार्क केली जातात. तर, दुसरीकडे दोन्ही बाजूला वाहने पार्क केली आहेत. हा मार्ग बसमुळे रखडला असल्याने पर्यायाने येथे अनेक वाहनचालक बिनधास्तपणे वाहने लावतात. चिखलीच्या दिशेने जाणार्‍या रस्त्यावरील जुने आरटीओ समोर आणि टेल्को कंपनीच्या समोरील पूलाखाली वाहने पार्क केल्याचे दिसून येते. महिनोमहिने येथे वाहने धूळ खात पडून आहेत.

सध्या शहरातील पाच ‘बीआरटी’ मार्गावर संचलनासाठी 568 बसेसची आवश्यकता आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील बीआरटी संचलन हे पूर्ण नियोजनानुसार करणे शक्य होत नाही. त्यामुळे हा मार्ग रखडला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button