breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

मेट्रो अधिकारी व ठेकेदारांच्या दुर्लक्षामुळे पिंपरी-चिंचवडकर असुरक्षित

राष्ट्रवादी युवक काॅंग्रेसचे मेट्रो प्रशासनाच्या विरोधात आंदोलन 

पिंपरी ( महा ई न्यूज ) – कासारवाडी येथील मेट्रोच्या पिलरचे काम सुरु असताना अचानक ड्रील मशिन कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने कोणतीही जिवितहानी झाली नसली तरी सुध्दा महामेट्रो प्रकल्पाच्या वरिष्ठ अधिका-यासह संबंधित कामाच्या ठेकेदाराने कामाकडे दुर्लक्ष केले आहे. या मेट्रोचे कामामुळे पिंपरी-चिंचवडकर नागरिकांना असुरक्षित वाटू लागले असून संबंधित अधिका-यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काॅंग्रेसच्या वतीने आज (रविवारी) झालेल्या आंदोलनप्रसंगी करण्यात आली. दरम्यान, नाशिक फाटा येथील आंदोलनात सत्ताधारी भाजप पदाधिका-यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. 

यावेळी पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, युवकचे शहराध्यक्ष विशाल वाकडकर, महिला अध्यक्षा वैशाली काळभोर, नगरसेविका सुलक्षणा धर शिलवंत, नगरसेवक राजू बनसोडे, माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, अतुल शितोळे, प्रदेशचे संघटक विशाल काळभोर तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

संजोग वाघेरे-पाटील म्हणाले की, शहरात मेट्रोला राष्ट्रवादीने मंजूर मिळविली होती. मात्र, आता सत्ताधारी भाजपकडून मेट्रोच्या कामाकडे दुर्लक्ष केले आहे. पालकमंत्र्यासह स्थानिक भाजप पदाधिका-यांचे कुठलेच नियंत्रण या कामावर नाही. भाजप नेत्यांच्या नातेवाईकांना या कामाचे ठेके दिले गेले आहेत. प्रशिक्षित कामगार न वापरता काम सुरू आहे. त्यामुळे कालची घटना घडली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी पिंपरी-चिंचवडकर मेट्रोच्या कामामुळे असुरक्षित झाले आहे. मेट्रोच्या कामामुळे कधी काहीही घडू शकते, असे प्रकार घडू नये म्हणून या घटनेतील संबंधित अधिका-यांसह ठेकेदाराची चाैकशी करुन दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. 

विशाल वाकडकर म्हणाले की, मेट्रोच्या कालच्या घटनेमुळे त्याचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. एवढी मोठी घटना घडूनही महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, पुण्याचे पालकमंत्री, स्थानिक आमदार घटनास्थळाकडे फिरकले सुध्दा नाहीत. यावरूनच सत्ताधाऱ्यांना पिंपरी-चिंचवड शहराविषयी किती आस्था आहे, हे यावरुन दिसून येत आहे. या घटनेला जबाबदार असणाऱ्या मेट्रो अधिका-यांचा जाहीर निषेध करत दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button