breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पालकमंत्री बापट यांना आमदार जगतापांनी दिल्या शुभेच्छा

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – पुणे लोकसभा मतदार संघातून पालकमंत्री गिरीष बापट यांचा विजय झाल्याने आमदार लक्ष्मण जगताप यांनी बापट यांची स्वेच्छा भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यांच्यासोबत पिंपरी-चिंचवड भाजपचे पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते उपस्थित होते.

पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष बापट यांचा पुणे लोकसभा मतदारसंघातून भरघोस मतांनी विजय झाला. बापट यांनी निवडणुकीची जोरदार तयारी केली होती. त्यांनी पालकमंत्री म्हणून पुण्यातील लोकांचे प्रमुख प्रश्न सोडविण्यावर भर दिला. त्यांची लोकप्रियता अधिकच वाढत गेली. लोकांनी त्यांना लोकसभेला उत्तम कौल दिला. त्यांचा विजय झाल्याने चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी आज पुण्यात त्यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समितीचे सभापती विलास मडिगेडी, पक्षनेते एकनाथ पवार, सरचिटणीस अमोल थोरात, शहर महिला अध्यक्षा शैला मोळक आणि नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button