breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

पुण्याची ‘पीएमपी’ बससेवा बंद पडणार?

पुणे – महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडने पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) बसेसना कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (सीएनजी) चा पुरवठा शुक्रवार ( दि.२४ ) बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पुण्याची लाईफलाईन असणाऱ्या पीएमपीच्या ताफ्यातील सीएनजीवर चालणाऱ्या १ हजार २३५ बसेस बंद पडणार आहे.

मागील २ वर्षापासून असलेली थकबाकी आजमितीस रुपये ४७ कोटी २२ लाख पर्यंत पोहोचली आहे. याबाबत एमएनजीएलकडून वेळोवेळी पत्रव्यवहार केला असूनही थकबाकी कमी करण्याबाबत पीएमपीएमएल कडून कोणतीही कार्यवाही केली जात नसल्याने हा निर्णय घेण्यात येत असल्याची माहिती महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडचे वाणिज्यिक संचालक संतोष सोनटक्के यांनी दिली.

पत्रकार परिषदेला एमएनजीएलचे व्यवस्थापकीय संचालक सुप्रियो हलदर, सरव्यवस्थापक सुजित रुईकर, मुख्य वाणिज्यिक अधिकारी एस. चंद्रमोहन, मुख्य व्यवस्थापक (वाणिज्य) मयुरेश गानू, सरव्यवस्थापक (मार्केटिंग) मिलिंद ढकोले आदी उपस्थित होते.

सुप्रियो हलदर म्हणाले, महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड हा गेल इंडिया लिमिटेड व भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन यांचा संयुक्त उपक्रम आहे. या कंपनी मध्ये महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र औद्योगिक महामंडळातर्फे भाग भांडवल गुंतवलेले आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या बसेसना सीएनजीचा पुरवठा एमएनजीएल मार्फत केला जातो. गेल्या अनेक दिवसांपासून पीएमपीएमएल प्रशासनाकडून गॅस पुरवठ्याची रक्कम वेळेवर दिली जात नसल्याने आजमितीस सुमारे रुपये ४२ कोटी २२ लाख थकबाकी शिल्लक आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button