breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रराजकारणराष्ट्रिय

अभिजित बिचुकलेंचं बागेश्वर महाराजांवर टिकास्त्र; म्हणाले, अशा महाराजांना कोलतो..

भारतात जितकं मला अध्यात्मिक ज्ञान आहे तितकं कुणालाही नाही

पुणे : गेल्या काही दिवसांपासून बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री हे अनेक वेगवेगळ्या विषयांमुळे प्रकाश झोतात आहेत. धीरेंद्र शास्त्री महाराज यांनी आपल्या प्रवचनातून संत तुकाराम महाराज यांच्या बद्दल अक्षेपार्ह वक्तव्य केलेला व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यांच्या या वक्तव्यांचा राज्यात तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर आता अभिजित बिचुकले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

संत तुकाराम महाराजांबद्दल असं वक्तव्य करणं या पुर्वी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल झालं. संत तुकाराम शिवाजी महाराजांचे गुरू आहेत. त्याच्याबद्दल काही दुमत नाही. पण जे कोणी असे भुल्लकड बाबा येत आहेत. किंवा जे कोणी राजकीय नेते येत आहेत ना त्यांना मी कोलतो.., असं वक्तव्य बिग बॉस फेम अभिनेते अभिजित बिचुकलेंनी केलं आहे.

भारतात जितकं मला अध्यात्मिक ज्ञान आहे तितकं कुणालाही नाही. मी एकादशी करतो, मी नवरात्र करतो, मी पुर्ण अध्यात्मिक आहे. तुमच्या महितीसाठी सांगतो मी रमजानचे देखील उपवास करतो. मुस्लिम बांधव अल्ला म्हणत असतील आम्ही विश्नु भगवान म्हणतो. त्यामुळे मी असल्या भुलक्कड लोकांना मी कोलतो, असंही अभिजित बिचुकले म्हणाले.

मी स्वत:ला स्टार समजत नाही. मी नेता समजत नाही, पण मी शंभर टक्के माझ्या विठु माऊलीचा वारकरी आहे. वारकरी जर त्यांना माफ करत असतील तर त्यांना विठुमाऊली बघुण घेईल, असंही बिचुकले म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button