breaking-newsआंतरराष्टीय

पाकिस्तानी तालिबानचा प्रमुख मौलाना फजलुल्लाह याचा खात्मा

  • मलाला युसुफझाईवरील हल्ल्याचाही होता प्रमुख सूत्रधार 

इस्लामाबाद – पाकिस्तानी तालिबानी संघटनेचा प्रमुख मौलाना फजलुल्लाह याचा खात्मा करण्यास अमेरिकेला यश आले आहे. अफगाणिस्तानच्या पुर्व कुनार प्रांतात ड्रोनच्या सहाय्याने अमेरिकेने त्याचा खात्मा करून मोठे यश मिळवले आहे. एका मोठ्या तालिबानी नेत्याला आम्ही टिपले आहे अशी माहिती अमेरिकन लष्करी सूत्रांनी काल दिली होती पण त्या नेत्याचे नाव मात्र त्यांनी जाहीर केलेले नव्हते. तथापी ठार झालेला हा नेता म्हणजे मौलाना फजलुल्लाह हाच असल्याची माहिती अमेरिकतील काहीं वृत्तपत्रांनी दिली आहे.

द एक्‍स्प्रेस ट्रिब्युन या दैनिकाने या विषयीची महिती देताना म्हटले आहे की नूर गुल कलाय गावातील एका संशयीत अड्ड्यावर अमेरिकेने ड्रोन हल्ला केला त्यात मौलना त्याच्या अन्य चार साथीदारांसह ठार झाला. तथापी या वृत्ताला अमेरिकेच्या लष्करी मुख्यालयाने मात्र अजून दुजोरा दिलेला नाहीं. तहरीक ए तालिबान पाकिस्तान या संघटनेकडूनही या विषयी अद्याप काही माहिती मिळू शकलेली नाही. मौलाना फजलुल्लाह हा पाकिस्तान आणि अमेरिकन लष्करावरील अनेक हल्ल्यांचा सूत्रधार आहे. तो 2013 सालापासून संघटनेची सूत्रे सांभाळत होता.

पेशावर येथे आर्मी पब्लिक स्कुलवर 2014 साली मोठा हल्ला झाला होता त्यात 151 जण मारले गेले आहेत. त्या हल्ल्याचाही तोच सूत्रधार होता. मलाला युसुफझाई या विद्यार्थीनीवर हल्ला करण्याचा इशाराही त्यानेच दिला होता. तालिबान आणि अफगाणिस्तान सरकारने ईदनिमीत्त तीन दिवसांची शस्त्रसंधी पुकारली असल्याच्या काळात हा हल्ला झाला आहे त्याविषयी अमेरिकन लष्कराचे अफगाणिस्तानातील कमांडर जन जॉन निकोलसन यांनी म्हटले आहे की आम्ही या शस्त्रसंधी कराराचा मान राखला आहे पण ही शस्त्रसंधीची अट अमेरिकन लष्कराच्या दहशतवाद विरोधी कृत्याला लागू नव्हती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button