breaking-newsआंतरराष्टीय

चीनमध्ये उत्पादन कमी; भारतीय तांदूळ निर्यातदरांसाठी होऊ शकते संधी

नवी दिल्ली : यूएसडीए अर्थात युनायटेड स्टेटस् डिपार्टमेंट ऑफ अॅग्रिकल्चरच्या ताज्या अहवालात म्हटल्यानुसार, सन २०१८-१९ मध्ये प्रामुख्याने चीनमधील उत्पादन घटल्याने जागतिक पातळीवरील तांदूळ पुरवठ्यात घट होऊन ते २.१ मिलियन टन होण्याचा अंदाज आहे.

चीनमधील तांदूळ काढणी क्षेत्र घटून ते ०.५ मिलियन हेक्टर झाले आहे आणि एकूण उत्पादन घटून २.३ मिलियन टन झाले आहे.

या परिस्थितीचा फायदा भारतीय तांदूळ निर्यातदारांना होऊ शकतो. कारण, बांगलादेशने आयात शुल्क वाढवल्याने त्यांना मोठा फटका बसला आहे. तर, भारतीय बिगर बासमती तांदळासाठी चीनने देखील दरवाजे खुले करण्याबाबत सहमती दर्शवली आहे. त्यामुळे लवकरच भारतीय तांदळाला मोठी बाजारपेठ उपलब्ध होणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button