breaking-newsTOP Newsपिंपरी / चिंचवड

‘महाईन्यूज’चा गणेशोत्सव : पिंपरी-चिंचवडकरांना कोरोनातून मुक्त कर, गटनेते कैलास बारणे यांचे बाप्पांना साकडे

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

”महाईन्यूज”च्या गणरायाची आरती आज पिंपरी-चिंचवड महापालिकेतील अपक्ष आघाडीचे गटनेते कैलास बारणे यांच्या हस्ते करण्यात आली. दरम्यान, बाप्पांना मनोभावे वंदन करून संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहराला कोरोनातून लागलीच मुक्त करण्याचे साकडे त्यांनी गणरायांना घातले.

सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा होत आहे. ”महाईन्यूज”ने देखील राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून अत्यंत साध्या पध्दतीने गणरायांची प्रतिष्ठापना केली आहे. तुरटीपासून बनविलेली गणपतीची मुर्ती सर्वांचे आकर्षण ठरत आहे. समाजात ही संकल्पना रुजविण्याची गरज असल्याचे गटनेते बारणे यांनी यावेळी म्हटले. त्यामुळे पर्यावरण संवर्धनाला चालना मिळेल. आणि घरामध्ये सहजरित्या विसर्जन करता येऊ शकेल. ”महाईन्यूज”ने तुरटीपासून बनिलेला गणपती बसविण्याची उत्तम संकल्पना राबविली आहे, त्याचा आदर्श शहरातील नागरिकांनी घेतला पाहिजे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केली.

कोविड 19 विषाणू पसरत असल्यामुळे यंदा गणेशभक्तांच्या आनंदावर विर्जन पडले आहे. परिणामी, गणेशोत्सव परंपरेला वेगळे वळण मिळाले आहे. विसर्जन घाटावर प्रशासनाने बंदी घातली आहे. याठिकाणी लोकांची गर्दी होऊ नये, यासाठी राज्य सरकारने मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. त्याचे सर्वांनी पालन केले पाहिजे. त्या सूचना समाजातील प्रत्येक नागरिकांसाठी महत्वाच्या मानल्या जात आहेत, असेही ते यावेळी म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button