breaking-newsUncategorizedताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

झोपडपट्टी निर्मुलन कार्यालयात घरकुलच्या वंचित लाभार्थ्यांचे ठिय्या आंदोलन

पिंपरी – महापालिकेच्या चिंचवड येथील झोपडपट्टी निर्मुलन व पुर्नवसन कार्यालयात कष्टकरी कामगार पंचायतीच्या वतीने घरकुलच्या बोगस लाभार्थ्यांवर कारवाई करा, यासह विविध मागण्याकरिता ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी कष्टकरी कामगार पंचायत अध्यक्ष बाबा कांबळे, धर्मराज जगताप , रवी शेलार , राम प्लहारे , भगवंत रामटेके ,  शोभा शिंदे , मालू गवई , रतन गायकवाड आदी उपस्थित होते.
चिंचवड गावातील झोपडपट्टी निर्मुलन व पुर्नवसन कार्यालयातील अधिका-यांनी चिखलीच्या घरकुल धारकांची माहिती अधिकारात मागितलेली माहिती देण्यास टाळाटाळ करित होते. तसेच तक्रार अर्ज करून देखील बोगस लाभार्थ्यांवर कारवाई करण्यात येत नसल्याच्या निषेधार्थ घरकुलच्या वंचित लाभार्थीनी ठिय्या आंदोलन करीत प्रशासनाचे कामकाज बंद पाडले. कष्टकरी कामगार पंचायतीच्या वतीने आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांना घरकुल मिळावे, याकरिता हे आंदोलन सुरु केले आहे. महापालिका प्रशासनाकडून माहिती अधिकारात माहिती मागून त्यातील बोगस लाभार्थ्यांची शोध घेतला आहे. त्या बोगस लाभार्थ्यावर कारवाई करा, अशी मागणी वारंवार केली जात आहे. परंतु, महापालिका झोपडपट्टी कार्यालयातील अधिका-यांच्या निष्काळजीपणामुळे घरकुलची माहिती देण्यास आणि बोगस लाभार्थ्यांवर कारवाईकडे दुर्लक्ष केले जात आहे.
दरम्यान, घरकुलच्या बोगस लाभार्थ्यांची माहिती न देणे, यापुर्वी बोगस आढळणा-या लोकांवर कारवाई न करणे, केवळ उडवाउडवीचे उत्तरे देवून आंदोलकांची दिशाभूल करणे, माहिती अधिकारातंर्गत माहिती न देणे, राजकीय दबावापोटी घरकुलच्या लोकांवरील कारवाई टाळणे, अशा वेगवेगळ्या कारणास्तव संतप्त झालेल्या घरकुलधारकांनी हे ठिय्या आंदोलन केले. याप्रसंगी घरकुल धारकांनी कार्यालयातच घोषणा देवून प्रशासनाचा निषेध नोंदविला. यावेळी झोनिपुचे सहाय्यक आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी वंचित घरकुल लाभार्थ्यांशी चर्चा करुन माहिती अधिकारात मागविलेली माहिती तत्काळ देण्याचे आदेश दिले. तसेच बोगस लाभार्थ्यांवर लवकरच कारवाई करु, असे आश्वासन दिले. त्यानंतर घरकुल आंदोलकांनी कार्यालयाचा ताबा सोडून आंदोलन स्थगित केले.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button