breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी विधानसभेसाठी एक अर्ज दाखल, 33 जण नामनिर्देशनपत्र घेवून गेले

लाेकशाही विचार मंचचे अपक्ष उमेदवार अजय लोंढे यांचा अर्ज दाखल

पिंपरी |महाईन्यूज |प्रतिनिधी|

विधानसभा निवडणूकीचा रणसंग्राम सुरु झाला आहे. राजकीय पक्षाकडून इच्छुकांना उमेदवारी जाहीर होवू लागल्या आहेत. 206 पिंपरी विधानसभा मतदारसंघातून भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, काॅंग्रेससह अपक्ष 33 इच्छुक उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र घेवून गेले आहेत. मात्र, 27 सप्टेंबरपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून सुट्टीचा दिवस वगळता दोन दिवसात एकच अर्ज दाखल झाला आहे. त्यामध्ये लोकशाही विचार मंचचे अजय लोंढे यांनी आज (सोमवारी) दाखल केला आहे.

206 पिंपरी विधानसभा मतदारसंघातून राजकीय पक्षाच्या इच्छुकांनी नामनिर्देशनपत्र घेवून गेले आहेत. त्यामध्ये राजेश गोविंदस्वामी पिल्ले (भाजप), अमित गणपत गोरखे (भाजप), भिमा सखाराम बोबडे (भाजप), तेजस्विनी चंद्रकांत कदम (भाजप), अमित अशोक उबाळे (शिवसेना), अॅड सचिन सुरेश भोसले (शिवसेना), सुलक्षणा शिलवंत-धर (राष्ट्रवादी), शेखर अशोक ओव्हाळ (राष्ट्रवादी), उत्कर्ष आनंद शिंदे (राष्ट्रवादी), राजू विश्वनाथ बनसोडे (राष्ट्रवादी), सुंदर मसुकांत कांबळे (काॅंग्रेस), शाम अभिमन्यू घोडके (मनसे), अनिल साहेबराव शिंदे (मनसे), विजय धर्मराज ओव्होळ (बहूजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी), जितेंद्र बाबासाहेब ननवरे (अपक्ष), दिलीप राजाराम पाटील (शेकाप), दिपक छबन अंकुश (बहूजन मुक्त पार्टी), संदीप सुरेश कांबळे (भारतीय धर्मनिरपेक्ष पार्टी), विजय हनुमंत रंदिल (बहुजन महा पार्टी), हेमंत अर्जुन मोरे (अपक्ष), अरुण गणपती कांबळे (अपक्ष), चंद्रकांता लक्ष्मण कांबळे (अपक्ष), डाॅ. अभिजित भालशंकर (अपक्ष), विजय गेडाम (अपक्ष), धनराज गायकवाड (बहुजन समाज पार्टी), चंद्रकांत अंबादास माने (वंचित आघाडी), जीवन गोविंद कांबळे (बहुजन समाज पक्ष), बाळासाहेब गायकवाड (वंचित आघाडी), अनिता रविंद्र साबळे (बहुजन रिपब्लकन सोशलिस्ट पार्टी), जीवन प्रकाश भोसले (अपक्ष), बाळासाहेब दगडू जगताप (वंचित आघाडी), सतीश रामभाऊ भोवाळ (अपक्ष), नागप्पा मंत्री (अपक्ष) या 33 इच्छुकांनी नामनिर्देशनपत्र घेवून गेलेले आहेत.

दरम्यान, 206 पिंपरी विधानसभा मतदारसंघात 33 इच्छुक उमेदवारानी नामनिर्देशनपत्र घेवून गेले आहेत. मात्र, त्यापैकी अजय लोंढे यांनी अपक्ष म्हणून आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button