breaking-newsताज्या घडामोडीमुंबईराजकारण

ठाकरे सरकार बाय बाय म्हणत भाजप चे विधानभवन परिसरात निदर्शने

मुंबई: महाराष्ट्र सरकारच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसर्‍या दिवशी आज विरोधी पक्ष भाजप कडुन राज्य सरकार विरुद्ध विधानभवन परिसरात आंंदोलन पुकारण्यात आलेले आहे. कोरोना व्हायरस संकट काळात महाराष्ट सरकार पुरेश्या उपाययोजना करत नसल्याचे मत भाजपकडुन मांंडण्यात आलेले आहे आणि त्याचाच धिक्कार करण्यासाठी हे आंदोलन पुकारण्यात आलेले आहे. यावेळी विधानभवनात जमलेल्या भाजप आमदारांंनी मुख्यमंंत्री उद्धव ठाकरे व राज्य सरकार वर ताशेरे ओढत पोस्टर झळकावलेले होते.

घरात बसुन रिमोटने सरकार चालवणार्‍या मुख्यमंंत्र्यांंचा धिक्कार असो, कोरोनाच्या महामारीत महाराष्ट्राला वार्‍यावर सोडणार्‍या ठाकरे सरकारचा धिक्कार असो, कोरोना हाय हाय ठाकरे सरकार बाय बाय अशा पाट्या झळकावत आंदोलनकर्त्यांनी घोषणा दिलेल्या होत्या. एकीकडे, कोरोनाच्या विरुद्ध महाराष्ट्र सरकारचा धिक्कार करत असताना दुसरीकडे स्वतः भाजप आमदारांंनी सुद्धा सोशल डिस्टंंसिंगचे नियम धाब्यावर बसवलेले आहेत. विधानभवन परिसरातुन समोर येणार्‍या फोटोंंमध्ये आपण हे पाहु शकताय. दरम्यान, आज महाराष्ट्र पावसाळी अधिवेशनाचा दुसर्‍या दिवसाचे कामकाज सुरु झाले आहे. आज विधानपरिषदे मध्ये सुद्धा शिवसेना व भाजप उमेदवारांंपैकी विधान परिषद उपसभापतींंची निवड होणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button