breaking-newsमहाराष्ट्र

आरक्षणाच्या निर्णयानंतर मराठा जात प्रमाणपत्राचं वाटप सुरु

राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिल्यानंतर जातीचे दाखले देण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. जालना जिल्ह्यातील एका तरुणाला हे जात प्रमाणपत्र मिळालं असल्याची माहिती मिळत आहे. वैभव ढेंबरे असं या विद्यार्थ्यांचं नाव आहे. मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिकदृष्या 16 टक्के आरक्षण देण्यात आलं आहे. यानंतर मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिकदृष्या मागास प्रवर्गासाठी आवश्यक असणारे जात प्रमाणपत्र आणि जात पडताळणी प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये जात प्रमाणपत्र मिळण्याची सुविधा देण्यात आली असून सेतू सुविधा केंद्रावर गर्दी होत आहे. जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी काही कागदपत्रांची पूर्तता करणं आवश्यक असून सात ते आठ दिवसांमध्ये प्रमाणपत्र मिळण्याची सुविधा देण्यता आली आहे.

विधिमंडळात मराठा समाज आरक्षणाचे विधेयक एकमताने मंजूर करण्यात आल्यानंतर राज्य सरकारने मागासवर्ग समितीचा अहवाल आणि विधेयक सुद्धा विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात मंजूर करून घेतला. यानंतर राज्यपालांनी स्वाक्षरी करून त्याचे कायद्यात रुपांतर केले आणि १ डिसेंबरपासून राज्यात मराठा समाजाला आरक्षणाचा कायदा लागू झाला आहे. दरम्यान मराठा आरक्षणाच्या विषयावर उच्च न्यायालयात राज्य सरकारची भूमिका भक्कमपणे मांडण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ज्येष्ठ विधिज्ञ हरीश साळवे यांची नियुक्ती केली आहे.

प्रमाणपत्र मिळवण्यासाठी काही कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे, ही कागदपत्रे खालीलप्रमाणे

१. जात प्रमाणपत्र हवे असलेल्या व्यक्तीचा स्वत:चा शाळा सोडल्याचा दाखला (हिंदू मराठा उल्लेख आवश्यक)

२. शाळा सोडल्याचा दाखला नसल्यास बोनाफाईड सर्टीफीकेट (जन्मतारीख व जातीचा उल्लेख आवश्यक)

३. वडिलांचा जन्म १३ ऑक्टोबर १९६७ रोजी किंवा त्यापूर्वी झाला असल्यास त्यांचा जातीचा पुरावा. य़ासाठी खालीलपैकी एक कागदपत्र लागेल.
– शाळेचा दाखला (हिंदू मराठा उल्लेख आवश्यक)
– जन्म-मृत्यूची नोंद असलेला महसूल अभिलेखातील पुरावा
– शासकीय किंवा निमशासकीय नोकरीचा जातीची नोंद साक्षांकित केलेला उतारा
– समाज कल्याण खात्याकडील जात पडताळणी समितीने वैध ठरविलेले जातीबाबत प्रमाणपत्र
– वडिलांचा जातीचा दाखला नसल्यास तसे शपथपत्र देणे आवश्यक आहे.

४. बहिण-भावांचा शाळा सोडल्याचा दाखला (हिंदू मराठा उल्लेख आवश्यक)

५. वंशावळ

६. महसूल पत्र

७. रहिवासी प्रमाणपत्र

८. रेशनकार्ड

९. आधारकार्ड

१०. एक छायाचित्र

– अर्जावर सर्व माहिती अचूक भरली आहे का ते तपासून घ्या. माहिती तपासल्यानंतर तुमच्या प्रतिज्ञापत्राची नोंदणी केली जाईल आणि तुम्हाला अर्जावर व प्रतिज्ञापत्रावर शिक्के देऊन सक्षम प्राधिकाऱ्याची सही आणण्यासाठी पाठवले जाईल.

– अर्ज जमा केल्यानंतर त्याची पोचपावती/टोकन घ्यावे. सदर टोकन वर तुमचा जातीचा दाखला मिळण्याची तारीख दिली जाते. हे टोकन जपुन ठेवावे.

– विवाहीत स्त्रियांसाठी प्रमाणपत्र हवे असल्यास पुढील पुरावे जोडावे
अ) विवाहापुर्वीची जात सिध्द करणारा कोणताही एक पुरावा
ब) विवाहाचा पुरावा म्हणून विवाह नोंदणी दाखला
क) राजपत्रात (Gazette) प्रसिध्द झालेला नावातील बदल व लग्नपत्रिका किंवा पोलीस यांचा दाखला

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button