breaking-newsआरोग्यताज्या घडामोडी

#CoronaVirus: रेल्वे गाड्यांमधील चहा, नाश्ता, जेवण बंद

कोरोना व्हायरच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर इंडियन रेलवे केटरिंग अँड टुरिझम कॉरपोरेशनने म्हणजे आयआरसीटीसीने 22 मार्चपासून खाण्यासंदर्भातील सर्व सुविधा बंद करण्याचा निर्णय घे़तला आहे. त्यामुळे आला  रेल्वेगाड्यांमधील प्रवाशांना चहा, नाश्ता आणि भोजनही मिळणार नाही. रेल्वेस्थानकांवरील फूड प्लाझा, रिफ्रेशमेंट, सेल किचन आणि जन आहारदेखील बंद करण्यात येणार आहे. 

आयआरसीटीसीचे ग्रुप महाव्यवस्थापक आशीष भाटिया यांनी यासंदर्भात 20 मार्चला सर्व झोनच्या महाव्यवस्थापकांना पत्र पाठवून सूचना केली आहे. यानुसार जोवर पूढील आदेश येत नाही, तोवर मेल आणि एक्सप्रेस ट्रेनमधील पेंट्रीकार आणि साइड वेंडिंग व्यवस्था बंद राहतील.

मुख्य क्षेत्रीय महाव्यवस्थापक अश्विनी श्रीवास्तव यांनी सांगितले, की मिळालेल्या सूचनांचे 22 मार्चपासून कठोरपणे पालन केले जाईल. यासंदर्भात सर्व रेल्वेस्थानकांना आदेश देण्यात आलेले आहेत.

यानिर्णयानंतर रेल्वेगाड्यांत पेंट्रीकार आणि साइड वेंडिंग बंद केल्यानंतर लवकरच रेल्वेस्थानकांवरील उपहारगृहेही बंद केली जाऊ शकतात, यासंदर्भात वरिष्ठ अधिकांऱ्यांतही विचार सुरू आहे. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button