breaking-newsमनोरंजन

अमिषा पटेलवर २.५ कोटी रुपयांच्या फसवणुकीचा आरोप

‘कहो ना प्यार है’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या अमिषा पटेलवर पुन्हा एकदा फसवणुकीचा आरोप लावण्यात आला आहे. एका चित्रपट निर्मात्याने अमिषा आणि तिच्या बिझनेस पार्टनर कुणालवर २.५ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. आमिषा आणि कुणालने २.५ कोटी रुपये अद्याप परत न केल्याचं निर्मात्याने म्हटलं आहे.

‘देसी मॅजिक’ या चित्रपटासाठी अमिषा आणि कुणालने चित्रपट निर्माते अजय कुमार सिंह यांच्याकडून २.५ कोटी रुपये घेतले होते. २०१३ साली या चित्रपटाच्या चित्रिकरणाला सुरुवात झाली. हे चित्रिकरण २०१८ साली पूर्ण होणार होतं. या चित्रपटातून मोठा फायदा होणार असून अमिषाने चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर व्याजासह संपूर्ण पैसे परत देणार होती. मात्र आमिषाने अद्यापही हे पैसे परत केले नाहीयेत, असं अजय कुमार यांनी सांगितलं.

दरम्यान, आमिषाचा हा चित्रपट आजतागायत प्रदर्शित झाला नाही. याविषयी तिच्याकडे विचारणा केल्यावर तिने ३ कोटी रुपयांचा चेक दिला होता. मात्र तो बाऊन्स झाला. इतकंच नाही तर या प्रकरणी तिला सांगितल्यावर तिने थेट पैसे देणार नसल्याचं सांगितलं. त्यासोबतच काही दिग्गज कलाकारांसोबतचे फोटो दाखवत धमकी दिली. सध्या याप्रकरणी मला चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. परंतु याबाबत अधिक कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नाही असं अजय कुमार सिंह यांनी सांगितलं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button