breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेशमनोरंजन

ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रेहमान यांना दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार जाहीर

मुंबई : ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रेहमान यांना दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी ही घोषणा केली आहे. वाहिदा रहमान यांनी ६०-७० च्या दशकात बॉलिवूडवर राज्य कें आहे.

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे. वहिदा रहमान यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील अतुलनीय योगदानाबद्दल या वर्षी प्रतिष्ठित दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे, हे जाहीर करताना मला अत्यंत आनंद आणि सन्मान वाटतो, असं अनुराग ठाकूर म्हणाले.

हेही वाचा – तुमचे बचत खाते बंद करायचे असल्यास कोणती बँक किती शुल्क आकारते?

वहिदा रेहमान यांचा जन्म तामिळनाडूतल्या चेंगलपेट गावात १९३८ मध्ये झाला. हे गाव आता मद्रास या शहराचे उपनगर आहे. त्यांनी त्यांची कारकीर्द तमीळ आणि तेलुगू चित्रपटांपासून सुरु केली. मात्र त्यांना प्रसिद्धी मिळाली ती हिंदी चित्रपटांमधील अभिनयामुळेच. वहीदा रहमान यांनी डान्सर म्हणून अलिबाबावम ४० थिरुदरगलम या तमिळ चित्रपटातून अभिनयात पदार्पण केले. एक फूल चार काँटे, चाँदनी,दिल्ली ६,बीस साल बाद या चित्रपटांमध्ये त्यांनी साकारलेल्या भूमिकेचे अनेकांनी कौतुक केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button