breaking-newsTOP NewsUncategorizedताज्या घडामोडीराष्ट्रिय

आनंदाची बातमी! २ वर्षांपर्यंत सुरक्षा देणार ‘ही’ कोरोना लस; वैज्ञानिकांचा दावा

होय. रशियन वैज्ञानिकांनी दावा केला आहे की,  स्पुटनिक-व्ही ही लस कोरोना व्हायरसपासून दोन वर्षांपर्यंत सुरक्षा देऊ शकते. रशियाने ऑगस्टमध्ये आपली लस स्पुटनिक व्ही लॉन्च केली होती. आतापर्यंत कोणतीही कोरोनाची लस व्हायरसच्या संक्रमणापासून कितपत सुरक्षा देईल याबाबत दावा करण्यात आला नव्हता.  

गमलेया रिसर्च इंस्टीट्यूटचे डायरेक्टर अलेक्जेंडर गिंट्सबर्ग यांनी दावा केला होता की,  स्पुटनिक-व्ही या लसीच्या माध्यमातून कोरोना व्हायरसच्या संसर्गापासून दोन वर्षांपर्यंत सुरक्षा प्रधान करता येऊ शकते.  टीएएसएस वृत्तसंस्थेच्या म्हणण्यानुसार, युट्यूबवरील व्हिडीओत सोव्हिएत वाहिनीवर अलेक्झांडर गिंट्सबर्ग म्हणाले, “सध्या मी फक्त सुचवू शकतो, कारण अधिक प्रयोगात्मक डेटा आवश्यक आहे. आमची लस इबोला लसीच्या आधारावर तयार केली गेली आहे.

वाचा- Corona Vaccine; करोनाची लस घेतल्यानंतर दोन महिने मद्यप्राशन बंद ठेवण्याच्या सूचना

आतापर्यंत या लसीशी संबंधित सर्व प्रयोगांच्या आकडेवारीवरून असे सूचित होते की ही लस दोन वर्ष किंवा त्याहून अधिक काळ संरक्षण प्रदान करू शकते. अलेक्झांडर  गिंट्सबर्ग यांच्या मते, ‘स्पुतनिक-व्ही’ ९६ टक्के केसेसमध्ये प्रभावी आहे. अंतरिम संशोधनाच्या परिणांमानुसार स्पुटनिक व्ही लस ४२ दिवसांनंतर ९५ टक्क्यांपेक्षा जास्त प्रभावी दिसून आली. 

अलेक्झांडर गिंट्सबर्ग  यांनी ‘स्पुटनिक-व्ही’ लसीबाबत सावधगिरीचा इशाराही दिला आहे., ते म्हणतात की ”ही लस घेतल्यानंतर लोकांनी मद्यपान केले तर या लसीचा परिणाम कमी होऊ शकतो.” अलेक्झांडर गिंट्सबर्ग यांच्याव्यतिरिक्त उप पंतप्रधान ततियाना गोलिकोवा यांनीही लोकांना मद्यपान न करण्याचे आवाहन केले आहे. लस घेतल्यानंतर लोकांनी मोठ्या प्रमाणावर मद्यपान केले तर लसीचा काहीही उपयोग होणार नाही.  

वाचाः ‘करोनाने तुमच्या कानात येऊन सांगितलंय का?’, सुधीर मुनगंटीवार सभागृहातच…

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button