breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महापाैर राहूल जाधव, आमदार महेश लांडगे यांनी 55 जोडप्यांचे केले कन्यादान

पिंपरी ( महा ई न्यूज ) –  महापौर राहुल जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार महेशदादा लांडगे स्पोर्टस् फाउंडेशन व महापौर राहुलदादा जाधव स्पोर्टस् फाउंडेशन यांच्या वतीने सर्व जातीधर्मीय ५५ जोडप्यांचा मोफत सामुदायिक विवाह सोहळा पारंपारिक रितीरिवाजानुसार रामायण मैदान, जाधववाडी, चिखली या ठिकाणी नियोजनबध्द रितीने हजारो लोकांच्या उपस्थितीत मंगलमय वातावरणात पार पडला.

महाराष्ट्रातील काही भागामध्ये जाणवणारी तीव्र पाणीटंचाई, दुष्काळ या गोष्टी लक्षात घेऊन सामाजिक संवेदना जपत महापौर राहुल जाधव यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सर्व जातीधर्मीय ५५ जोडप्यांचा मोफत सामुदायिक विवाह सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. गेल्या वर्षीप्रमाणेच या वर्षीही वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून महाराष्ट्राच्या विविध भागातील गोरगरीब, मध्यम वर्गीय लोकांचा विवाह सोहळा पार पडला.

या विवाह सोहळ्याप्रसंगी सर्व ५५ जोडप्यांचे कन्यादान भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे तसेच त्यांच्या पत्नी शिवांजली सखी मंचाच्या अध्यक्षा पुजाताई लांडगे, महापौर राहुल जाधव व त्यांच्या पत्नी श्री दत्त दिगंबर नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षा मंगलताई जाधव यांनी केले. विवाह सोहळ्यातील सर्व ५५ जोडप्यांना महापौर राहुलदादा जाधव स्पोर्टस् फाउंडेशनकडून संसारोपयोगी विविध वस्तू देण्यात आल्या. विवाह सोहळ्यातील बैठक व्यवस्था, भोजनाची व्यवस्था, काटेकोर नियोजन, लग्नप्रसंगी काढलेली भव्य दिव्य मिरवणूक सर्वांचेच लक्ष वेधून घेत होती.

सामाजिक जाणीव लक्षात घेऊन हा सर्व जातीधर्मीय मोफत सामुदायिक विवाह सोहळा सुरक्षित, शिस्तीत, र्निविघ्नपणे, पार पडण्याकरिता हजारो कार्यकर्ते स्वत: मनापासून अहोरात्र मेहनत घेत होते. यावेळी महापौर राहुल जाधव व आमदार महेश लांडगे दोघेही सपत्नीक विवाह सोहळयास आलेल्या सर्व मान्यवरांचे व पाहुण्यांचे मन:पूर्वक स्वागत करत होते. याप्रसंगी हजारोंच्या जनसमुदायासह मंगलदास बांदल, जुन्नर विधानसभा आमदार शरद सोनवणे, अनाथांची माय सिंधूताई सपकाळ, माजी महापौर नितीन काळजे, स्थायी समिती अध्यक्ष विलास मडिगेरी, महापालिकेतील विविध समित्यांचे अध्यक्ष, सन्माननीय नगरसेवक, नगरसेविका याप्रसंगी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button