breaking-newsपुणेमहाराष्ट्र

…तर संतोष जुवेकरविरुध्दचा गुन्हा मागे घेणार

पुणे – सहकारनगर येथे आयोजित दहीहंडी मंडळाविरुद्ध गुन्हा दाखल करताना मराठी अभिनेता संतोष जुवेकरविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावर संतोष जुवेकर याने आपण घटनेच्या दिवशी ठाण्यात असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. मात्र, पोलिसांनी मंडळाने लावलेल्या पोस्टरवर संतोष जुवेकरचे नाव होते तसेच स्टेजवरही त्याच्या सारखाच व्यक्ती उपस्थित असल्याने हा गुन्हा दाखल केल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. तपासात संतोष जुवेकर उपस्थित नसल्याचे आढळल्यास त्याच्याविरुद्धचा गुन्हा मागे घेण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले.

सहकारनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अरण्येश्‍वर मंडळाने दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले होते. यावेळी मोठ्या प्रमाणात गर्दी जमल्यामुळे वाहतूक कोंडी झाली होती. तसेच, ध्वनिप्रदूषणही मोठ्या प्रमाणात झाल्याने पोलिसांनी मंडळाने लावलेल्या पोस्टरवरील अध्यक्ष, स्टेज मालक, साऊंड मालक आणि अभिनेता संतोष जुवेकर याच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button