breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

मुंबई-हावडा मेलचे 3 डबे घसरले, 12 गाड्या रद्द

मुंबई – इगतपुरीजवळ मुंबईवरून हावडाला जाणाऱ्या मुंबई-हावडा मेलचे तीन डबे रेल्वे रुळावरून घसरले. रात्री 12 च्या सुमारास ही घटना घडली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र, काही प्रवासी जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या मार्गावरून जाणाऱ्या लांबपल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

या अपघातामुळे पंचवटी, राज्यराणी, गोदावरी एक्‍स्प्रेससह 12 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही गाड्या इतर रेल्वे स्थानकावर थांबवण्यात आल्या आहेत. तसेच मुंबई-पटना एलटीटी-पाटलीपुत्र एक्‍स्प्रेस व मुंबई-बनारस महानगरी एक्‍स्प्रेस या गाड्यांचे मार्ग बदलून त्या पुणे मार्गे सोडण्यात आल्या आहेत. घसरलेले डबे बाजूला काढण्यात आले आहेत. प्रशासनाने मुंबईकडे जाणारी अप लाईन मोकळी केली असून त्यावरून धीम्या गतीने काही गाड्या जात आहेत. मात्र डाऊन लाईन अजून ही बंद असल्याने दिल्ली व उत्तर भारताकडे जाणाऱ्या गाड्याचा खोळंबा झाला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button