TOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्र

सोसायटीची संरक्षण भिंत पडली : चिखलीमध्ये सुरू असलेल्या गृहप्रकल्पाचे काम धोकादायक?

सोसायटीचे झालेले नुकसान भरपाई करावी, अन्यथा काम थांबविण्याची रहिवाशांची मागणी

पिंपरीः चिखलीमधील ऐश्वर्यम हमारा म्हाडा या सोसायटीच्या शेजारीच या एका इमारतीचे बांधकाम सुरू आहे. हे बांधकाम अतिशय असुरक्षितपणे सुरू असून, शेजारील सोसायटीची संरक्षण भिंत या सुरू असलेल्या बांधकामामुळे पडली. महानगर पालिकेच्या पाण्याची पाईपलाईन देखील यांमुळे खराब झालेली आहे. शिवाय पाण्याच्या टाकीला तडे गेलेले आहेत. या इमारतीच्या विकासकांवर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी येथील संतप्त रहिवाशांनी केलेली आहे.

ऐश्वर्यम हमारा म्हाडा या सोसायटीचे विकासक सतीश अग्रवाल, आणि नरेंद्र अग्रवाल यांनी एका गृहप्रकल्पाचे काम चालू केलेले आहे. परंतु या गृहप्रकल्पाचे काम चालू करत असताना संबंधित विकासकांनी सुरक्षेच्या कोणत्याही नियमाचे पालन केलेले नाही. या ऐश्वर्यम हमारा म्हाडा सोसायटीची संरक्षक भिंत या चालू असलेल्या कामामुळे पडलेली आहे. तसेच या सोसायटीच्या पाण्याच्या टाकीला देखील तडे गेलेले आहेत.

ऐश्वर्यम हमारा म्हाडाचे काम देखील निकृष्ट दर्जाचे
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने दिलेली पाण्याची पाईपलाईन पूर्णपणे तुटलेली आहे. त्याचप्रमाणे या सोसायटीच्या बिल्डिंगलादेखील यापासून धोका निर्माण झालेला आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने घालून दिलेले सुरक्षिततेचे कोणत्याही नियम या बिल्डरकडून पाळले जात नाहीत. हा नागरिकांच्या जीवाशी खेळ आहे. या ऐश्वर्यम हमारा म्हाडा या सोसायटीचे काम देखील अतिशय निकृष्ट दर्जाचे केलेले आहे.

संबंधित गृहप्रकल्पाच्या विकासकांनी हे काम त्वरित थांबवावे. तसेच या ऐश्वर्यम हमारा महाडा या सोसायटीची संरक्षक भिंत, तसेच पाण्याच्या टाकीला गेलेले तडे, तोडलेली पाईपलाईन या सर्व गोष्टी दुरुस्त करून द्याव्यात. तोपर्यंत हे काम चालू करू नये अन्यथा या कामामुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानीस, जीवित हानीस या प्रकल्पाचे विकासक जबाबदार राहतील. याबाबत आम्ही आमच्या फेडरेशनमार्फत पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंग यांना कळविलेले आहे

– संजीवन सांगळे,.
अध्यक्ष, चिखली- मोशी- पिंपरी चिंचवड हाउसिंग सोसायटी फेडरेशन.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button