पिंपरी / चिंचवड

महिलेच्या विनयभंग प्रकरणी तरुणाला अटक

पिंपरी l प्रतिनिधी

घरात घुसून महिलेशी आणि तिच्या सासूशी गैरवर्तन करत त्यांचा विनयभंग केला. याप्रकरणी पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. ही घटना रविवारी (दि. 6) पहाटे तीन वाजताच्या सुमारास विठ्ठलवाडी देहूगाव येथे घडली.

रोहित बंडू चौधरी (वय 18, रा. विठ्ठलवाडी, देहूगाव) असे अटक केलेल्या आरोपी तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी पीडित महिलेने देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी चौधरी हा फिर्यादी यांच्या घरात आला. त्याने फिर्यादी यांच्याशी गैरवर्तन करत तो कल्प्या कुठे आहे, असे विचारले. त्यानंतर धक्काबुक्की करून फिर्यादी महिलेच्या सासू सोबत गैरवर्तन करत सासूचा देखील विनयभंग केला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button