पिंपरी / चिंचवड

पोलिसात तक्रार केल्यास परिसरात राहू देणार नाही; विनयभंग करणाऱ्या व्यक्तीची महिलेला धमकी

पिंपरी l प्रतिनिधी

एका व्यक्तीने महिलेसोबत गैरवर्तन करत तिचा विनयभंग केला. त्यानंतर ‘पोलिसात तक्रार केल्यास परिसरात राहू देणार नाही’ अशी धमकी दिली. ही घटना रविवारी (दि. 6) दुपारी दोन वाजता चक्रपाणी वसाहत, भोसरी येथे घडली.

संजय माने (रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला त्यांच्या जावेसोबत घरासमोर गप्पा मारत थांबल्या होत्या. त्यावेळी आरोपीने त्यांच्याकडे पाहून शिट्टी वाजवली आणि हाताने वाईट इशारा केला. याबाबत फिर्यादी यांनी विचारणा केली असता आरोपीने अर्धनग्न होऊन वाईट इशारे केले. त्यानंतर फिर्यादी महिलेसोबत गैरवर्तन करत तिचा विनयभंग केला.

अश्लील शिवीगाळ करून घडलेल्या प्रकाराबाबत पोलिसात तक्रार केल्यास परिसरात राहू देणार नाही, अशी आरोपीने धमकी दिली. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button