breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘कोविड-19’,वायसीएम रुग्णालयात काम करणा-या कर्मचा-यांना प्रोत्साहनपर एक वेतनवाढ द्या

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या धर्तीवर प्रोत्साहनपर भत्ता द्यावा, कर्मचा-यांची मागणी

महापाैर माई ढोरे, आयुक्त श्रावण हर्डिकर यांना कर्मचा-यांचे पत्र

पिंपरी |महाईन्यूज|प्रतिनिधी

करोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असताना जिवाची पर्वा न करता महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृति रुग्णालयात वर्ग दोन ते चारचे सर्व कर्मचारी अहोरात्र काम करीत आहे. त्या कर्मचा-याचे मनोबल व प्रोत्साहन वाढवावे, याकरिता त्या सर्वांना प्रोत्साहन म्हणून एक विशेष वेतनवाढ करावी, अशी मागणी वायसीएम रुग्णालयीन कर्मचा-यांनी केली आहे.

महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डिकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड शहरात करोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालला आहे. दररोज शेकडो रुग्ण पाॅझिटिव्ह आढळत आहेत. त्या रुग्णांवर महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

महापालिकेचे हे रुग्णालय कोविड-19 करिता समर्पित केले आहे. सध्य स्थितीत परिचारिका, पॅरामेडीकल्स, लिपिक, वाॅर्ड बाॅय, आया, सफाई कामगार हे जिवावर उधार होवून अहोरात्र परिश्रम घेत आहेत. कोविड रुग्णालयात काम करताना अनेकजण संक्रमित झाले आहेत. काही कर्मचारी अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत. तर काहींनी आपला जीव देखील गमाविला आहे. याशिवाय परिचारिका व वर्ग चारच्या कर्मचा-यांना अतिरिक्त कामाचा ताण सहन करावा लागत आहे.

दरम्यान, कोविड रुग्णालयात काम करताना प्रतिबंधात्मक उपाय योजनेंर्गत सर्व कर्मचा-याचे मनोबल व प्रोत्साहन वाढवण्यासाठी रुग्णालयातील कर्मचा-यांना प्रोत्साहन म्हणून एक विशेष वेतनवाढ देण्यात यावी, अशी मागणी वायसीएम रुग्णालयातील अधिकारी व कर्मचा-यांनी महापाैर माई ढोरे, आयुक्त श्रावण हर्डिकर यांच्याकडे केली आहे.

प्रोत्साहनपर भत्ता द्यावा

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या धर्तीवर पिंपरी चिंचवड महापालिकेने वायसीएम रुग्णालयातील आरोग्य सेवेतील परिचारिका, निम वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, सर्व डाॅक्टर यांना दैनंदिन भत्ता 300 रुपये प्रति अधिकारी, कर्मचारी यांना देण्यात यावा, तसेच करोना विषाणू संसर्गाने बाधित मृत झालेल्या रुग्णांचे मृतदेह व्यवस्थितपणे बंधिस्त करुन नातेवाईकांकडे सुपूर्द करणा-या कर्मचा-यांना विशेष प्रोत्साहन भत्ता म्हणून प्रतिदिन 500 रुपये द्यावेत, अशी मागणी वायसीएम रुग्णालयातील कर्मचा-यांनी केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button