breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महापालिका करणार ‘टॅमिफ्लू’ची आैषधांची खरेदी

पिंपरी – महापालिकेची रुग्णालये व दवाखान्यांसाठी स्वाइन फ्लू प्रतिबंधक औषधे, लस व इतर साधनसामग्री यांचा पुरवठा सरकारकडून होतो. सदरचा पुरवठा सध्या कमी प्रमाणात होत असून, स्वाइन फ्लूबाधित रुग्णांच्या संख्येत मात्र वाढ होत आहे. त्यांच्या सोयीसाठी औषधे (टॅमिफ्लू), लस व इतर साधनसामग्री तातडीने खरेदी करणे गरजेचे असल्याने ते खरेदी करण्याची वेळ महापालिकेवर आली आहे.

शहरात स्वाइन फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. त्याला आळा घालण्यासाठी महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने उपाययोजना सुरू केल्या आहेत. टॅमिफ्लू गोळ्या, गरोदर माता, गंभीर रुग्ण, स्वाइन फ्लू रुग्णांसाठीच्या वॉर्डातील कर्मचारी, लहान मुले यांच्यासाठी लसीची आवश्‍यकता आहे. त्यामुळे तातडीची बाब म्हणून महापालिकेच्या औषध भांडार विभागाने औषधे व लस उपलब्ध करण्याची मागणी केली आहे. त्यानुसार लसीचे दीड हजार डोस खरेदी करण्यात येणार आहेत. त्यासाठी सुमारे तीन लाख ८७ हजार रुपये खर्च अपेक्षित असून, लस खरेदीची प्रक्रिया महापालिका वैद्यकीय विभागाने सुरू केलेली आहे.

खासगी पुरवठादारांकडून खरेदी
पालिकेचे शहरातील दवाखाने व रुग्णालयांना ‘टॅमिफ्लू’ गोळ्यांचा पुरवठा करण्यासाठी, त्यांचा साठा उपलब्ध ठेवण्यासाठी आणि रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांच्या सोयीसाठी औषध खरेदीची आवश्‍यकता आहे. नोंदणीकृत असलेले औषध पुरवठादार चिंचवड येथील राशी एंटरप्राइझेस, पुण्यातील रोहित एंटरप्राइझेसकडून पालिका खरेदी करणार आहे. हा विषय मंगळवारी (ता. २१) ‘स्थायी’समोर मंजुरीसाठी ठेवला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button