Uncategorizedताज्या घडामोडीमुंबई

मुंबईतल्या तरुणाने बागेतल्या पक्ष्यांना मारण्यासाठी झाडली गोळी, पण नेम चुकला अन् घडलं भलतंच

मुंबईः योगासने करणारा एका व्यक्ती एअर गनने गोळी झाडल्याने जखमी झाल्याचा प्रकार मुंबईत घडला आहे. ओम नारायण यादव असं या व्यक्तीचे नाव असून त्याच्या उजव्या बरगडीला दुखापत झाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तक्रार दाखल केली असून खरा प्रकार समोर येताच पोलिसही चक्रावले आहेत. मनोज मलखानी यांनी झाडलेल्या एअर गनमुळं यादव यांना गंभीर दुखापत झाली आहे. पोलिसांनी मलखानी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हे कृत्य मी हेतुपुरस्पर केले नसून मी केवळ पक्ष्यांना घाबरवण्यासाठी बागेजवळीच त्याच्या बंगल्यातील झाडावर गोळीबार केला होता, असा दावा मलखानी यांनी केला आहे.

यादव ज्या ठिकाणी योगासने करत होती त्या ठिकाणापासून अवघ्या २५ फूट अंतरावरून एअर गनमधून गोळी झाडण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेत यादव हे जखमी झाले आहेत. पोशा नाखवा गार्डन येथील स्केटिंग ट्रॅकवर शनिवारी ही घटना घडली असून मलखानी हे लाँड्री व्यवसायात असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.

यादव म्हणाले की, सकाळी १०.१५ च्या सुमारास मी योगा करत असताना छातीत जळजळ होत असल्याचे जाणवले. त्यावेळी बागेत उपस्थित असलेल्या काही मुलांनी मला सांगितले की मला छातीतून रक्तस्त्राव होत आहे. त्यानंतर मी तपासले असता बरगडीला गोळी लागल्याने मला गंभीर दुखापत झाली असल्याचे जाणवले. सहा महिन्यांपूर्वीही अशीच एक घटना घडली होती, अस त्या मुलांनी मला सांगितलं, अशी माहिती यादव यांनी दिली आहे. यादव यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

मी जखम झालेल्या भागावर हात चोळल्यावर गोळी खाली पडली. त्यानंतर तातडीने मी पोलिसांच्या इमर्जन्सी नंबर १००वर फोन केला. त्यानंतर पोलिस घटनास्थळी पोहोचल्यानंतर आम्ही त्या बंगल्यात गेलो. आणि त्या व्यक्तीकडे एअर गन आहे की नाही हे तपासले. त्यावेळी मलखानी यांच्याकडे एअर गन असल्याचे समोर आले आणि ती एअर गन त्याचीच असल्याचंही त्याने कबुल केले, असं यादव म्हणाले.

भारतीय दंड संहितेच्या कलम ३३६ (दुसर्‍यांचा जीव किंवा वैयक्तिक सुरक्षितता धोक्यात आणणारे निष्काळजी कृत्य) आणि ३३७ (इतरांचा जीव किंवा वैयक्तिक सुरक्षितता धोक्यात आणणारे कृत्य) अंतर्गत मलखानीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्याची एअर गनही जप्त करण्यात आली आहे. एअर गन ठेवण्यासाठी परवान्याची गरज नसते. मलखानी याला सीआरपीसी अंतर्गत नोटीसही बजावण्यात आली आहे,” असे वर्सोवा पोलिसांचे वरिष्ठ निरीक्षक सिराज इनामदार यांनी सांगितले.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button