breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्र

पुण्यात पावसाला सुरुवात, हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी

पुणे : आज पुण्यात पावसाने हजेरी लावली आहे. तर काही दिवसांपासून काही भागात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. सोबत गारांचा मारा देखील सुरू आहे. तसंच हवामान विभागाकडून पुणे जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

भारतीय हवामान विभागाने आगामी काही दिवस महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तसेच आज मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात गारपीट होणार असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यामुळे निश्चितच राज्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

याशिवाय नाशिक, नगर, पुणे, सातारा, छत्रपती संभाजीनगर, जालन, बीड, परभणी, हिंगोली, बुलढाणा, अमरावती, वाशीम, यवतमाळ या जिल्ह्यातील काही भागात वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तसेच राज्यातील पालघर, ठाणे, राजगड, मुंबई, रत्नागिरी, नंदुरबार, धुळे, जळगाव, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, धाराशिव, लातूर, नांदेड, अकोला, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यातही पावसाची शक्यता कायम राहणार असून या जिल्ह्यांना यलो अलर्ट भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button