breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

‘तुम्ही गद्दारी केली, डाकूंसोबत गेलात’, शेतकऱ्याने आमदार बच्चू कडूंना सुनावलं

काय वागत आहात तुम्ही, लोकशाही टिकवा

धाराशिव : तुम्ही गद्दारी केली, डाकूंसोबत गेलात, असं थेट धाराशिव येथे एका ८० वर्षीय वृद्ध शेतकऱ्याने प्रहारचे आमदार बच्चू कडू यांना चांगलच सुनावलं आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

ज्यासाठी तुम्हाला निवडून दिलंय, ते आपण करत नाही. तुम्ही महाडाकूंसोबत गेलात, असं म्हणत या शेतकऱ्याने आमदार बच्चू कडू यांची गाडी अडवली. यादरम्यान बच्चू कडू यांच्या समर्थकांनी या शेतकऱ्याशी अरेरावी करत बाजूला करत आमदार बच्चू कडू यांनी पळ काढला.

काय वागत आहात तुम्ही. लोकशाही टिकवा. घटना टिकवून त्याप्रमाणे वागा. का जनतेला त्रास देत आहात, असा थेट सवाल त्या शेतकरी आजोबांनी बच्चू कडू यांना केला. यावेळी बच्चू कडू यांच्या कार्यकर्त्यांनी आणि एका पोलीस कर्मचाऱ्याने ओढत त्यांना बाजूला केलं. यादरम्यान बच्चू कडू काहीन बोलता निघून गेले.

आमदार बच्चू कडू यांना सोमवारी झाराशिव सत्र न्यायालयाने २०१५ सालच्या प्रकरणात एक दिवस कोर्टात बसून राहण्याची आणि दंड भरण्याची शिक्षा सुनावली होती. त्यांनी धाराशिव येथील जिल्हा परिषद कार्यालयात गोंधळ घालत पोलिसांना अरेरावीची भाषा वापरली होती. त्याचप्रकरणी त्यांना न्यायाधिश राजेश गुप्ता यांनी शिक्षा सुनावली होती. सगळं संपवून बच्चू कडू बाहेर पडत असताना हा सर्व प्रकार घडला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button