Uncategorizedताज्या घडामोडीमुंबई

SSC RESULT 2022: दहावीच्या निकालानंतर जुळ्या भावांची जोरदार चर्चा, निकाल पाहताच घरचेही चकीत

मुंबई : राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाचा इयत्ता दहावीचा निकाल (SSC Result 2022) जाहीर झाला आहे. एकूण ९६.९४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा (९९.२७ टक्के) तर सर्वात कमी निकाल नाशिक विभागाचा (९५.९० टक्के) आहे. अशात मुंबईच्या भांडूपमध्ये दोन जुळ्यांना भावांना सारखेच गुण मिळाले आहेत.

मुंबईच्या जुळ्या भावांना दहावीत एकसारखेच गुण मिळाले आहेत. सौरभ धनाजी ढगे आणि साहिल धनाजी ढगे अशी या भावंडांची नावं आहेत. SSC परीक्षेत घवघवीत यश मिळवलं असून या जुळ्या भावांनी मार्कांमध्येही कमालच केली आहे.

दहावीचा ऑनलाईन निकाल जाहीर झाला आहे. या निकालामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. या दोघांनाही ८५ टक्क्यांपेक्षाही जास्त गुण मिळाले आहेत. दोन्ही भावांना अगदी सारखेच गुण मिळाल्यामुळे सध्या या दोघांची जोरदार चर्चा सुरू आहे.

दरम्यान, यंदा करोना महामारी काळानंतर पहिल्यांदाच झालेली ही दहावीची परीक्षा आहे. मागील वर्षी दहावी, बारावीच्या परीक्षा रद्द झाल्या होत्या. त्यामुळे यंदाच्या निकालाबाबत एक वेगळी उत्सुकता होती.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button