श्री. धुंदीबाबा विद्यालय विद्यानगरचा इयत्ता दहावीचा 98.86 टक्के निकाल
गुरुकुल वर्गाचा 100 टक्के निकाल, धनश्री जाधव प्रथम तर प्रज्ञा गुजरचा द्वितीय क्रमांक

कुडाळ (ता. जावली, जि. सातारा)
स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद असलेले रयत शिक्षण संस्थेचे श्री. धुंदीबाबा विद्यालय विद्यानगर, ता. जावली, जि. सातारा या शाळेचा इयत्ता दहावीचा 2022-2023 या सालचा निकाल 98.86 टक्के लागला आहे. तर गुरुकुल वर्गाचा 100 टक्के निकाल लागला आहे. इयत्ता दहावीसाठी एकूण 88 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी 87 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. जावली तालुक्यात रयत शिक्षण संस्थेच्या या शाळेचा निकाल सर्वोत्कृष्ट लागल्याने शिक्षक, विद्यार्थी तसेच पालकांमध्ये आनंदाचे वातावरण पहायला मिळाले.
कु. धनश्री अगतराव जाधव हिने 94.40 टक्के गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक मिळवला. तर कु. प्रज्ञा राहुल गुजर हिने 93.40 टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक मिळवला. तर प्रथमेश धोंडे यास 89.40 टक्के तसेच नेहा सावंत हिस 89.40 गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळाला आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन शालेचे प्रभारी मुख्याध्यापक एस. एस. जाधव सर यांनी केले. तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. अशी माहिती विद्यालयाचे उपशिक्षक एस. ई. लांडेसरांनी महाईन्यूजला दिली.
इयत्ता दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांच्या यशासाठी वर्गशिक्षिका वाघ मॅडम, भोसले मॅडम, मुजावर सर, जाधव सर तसेच सर्वच शिक्षक वृंदांनी पोटतिडकीने मेहनत घेत अहोरात्र मार्गदर्शन केले.