TOP Newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशमहाराष्ट्रराजकारणराष्ट्रिय

एकदम फ्री मध्ये हे अपडेट करू शकता आधार कार्ड, मोदी सरकारचा मोठा निर्णय

नवी दिल्लीः आधार कार्डला अपडेट करण्यासाठी जे ५० रुपये आकारले जात होते ते आता द्यायची गरज नाही. तुम्ही एकदम फ्री मध्ये हे अपडेट करू शकता. मोदी सरकारने असा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे. 2024 मध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्याआधीच मोदी सरकारने सर्वसामान्यांना एक भेट दिली आहे. केंद्रातील मोदी सरकारने सर्वसामान्य नागरिकांना एक जबरदस्त भेट दिली आहे. ऑनलाइन आधार कार्ड अपडेट करणाऱ्या यूजर्सला आता फुकटात हे अपडेट करता येवू शकणार आहे. सरकारकडून बुधवारी सांगितले की, पुढील तीन महिन्यांपर्यंत ऑनलाइन आधार अपडेट करणाऱ्याला आता कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. याआधी यासाठी ५० रुपये चार्ज आकारला जात होता. परंतु, आता आधार कार्ड अपडेट फ्री मध्ये होणार आहे. ऑफलाइन किंवा केंद्रावर जावून तुम्ही आधार कार्ड अपडेट करू शकता. जाणून घ्या डिटेल्स.

कधीपर्यंत फीस लागणार नाही
आधार कार्ड अपडेटसाठी ५० रुपये चार्ज आकारले जात होते. परंतु, आता १५ मार्च २०२३ पासून १४ जून २०२३ पर्यंत हे फ्रीमध्ये करता येणार आहे. याचाच अर्थ १४ जून २०२३ पर्यंत या अपडेटसाठी कोणतेही चार्ज लागणार नाही.

का घेतला निर्णय
आधार कार्ड जारी होवून जवळपास १० वर्षे झाली आहेत. या दरम्यान अनेक लोकांचा पत्ता, नाव बदलले आहेत. त्यामुळे सुरक्षेचे कारण पाहून UIDAI कडून सर्व आधार कार्डला अपडेट करण्याचा सल्ला दिला गेला आहे. आधार अपडेट ऑनलाइन वेग आणखी वेगवान करण्यासाठी मोदी सरकारकडून ५० रुपये फी तात्पुरती थांबवली आहे.

कसे कराल ऑनलाइन आधार अपडेट
स्टेप 1: सर्वात आधी myAadhaar portal वर जा, या ठिकाणी Update your Address Online वर क्लिक करावे लागणार आहे.

स्टेप 2: यानंतर Proceed to Update Address वर क्लिक करावे लागणार आहे.

स्टेप 3: पुन्हा एक नवी विंडो ओपन होईल. ज्यात तुम्हाला १२ डिजिटचा आधार नंबर टाकावा लागेल. पुन्हा Send OTP वर क्लिक करावे लागणार आहे.

स्टेप 4: या नंतर तुमच्या रजिस्टर्ड नंबरवर ओटीपी पाठवला जाईल. याला व्हेरिफाय करावे लागेल.

स्टेप 5: यानंतर पत्ता प्रूफला अपलोड करून सबमिट करावे लागेल.

स्टेप 6: यानंतर तुमचे आधार अपडेट होईल. तसेच १४ डिजिटचे URN जनरेट होईल. या URN च्या मदतीने आधार अपडेट स्टेट्सचा पत्ता लावून त्याला डाउनलोड करता येणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button