breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

‘अंनिस’च्या हस्तक्षेप याचिकेवर इंदोरीकर महाराजांचा आक्षेप

शिर्डी – कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्य प्रकरणी अंधश्रद्धा निर्मुलन समितीने हस्तक्षेप याचिका सादर केली होती. त्यावर इंदोरीकर महारांच्या वकिलांनी आक्षेप घेतला आहे. आज संगमनेर जिल्हा न्यायालयात यावर सुनावणी झाली. या प्रकरणाची पुढील सुनावणी 18 सप्टेंबर रोजी संगमनेर येथील जिल्हा न्यायालयात होणार आहे.

इंदोरीकर महाराजांचा पुत्रप्राप्तीविषयीचा एका व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. त्यानंतर त्यांच्या या वक्तव्यावर अनेकांनी आक्षेप घेतला. काही सामाजिक संघटना आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीने इंदोरीकर महाराजांवर गुन्हा दाखल करा अशी मागणी केली होती. मात्र, त्यांनी हे वक्तव्य कुठे आणी कधी केले याबाबत कुठलाही पुरावा नसल्याचं कारण देत मार्च महिन्यात अहमदनगर जिल्हा प्रशासनाने गुन्हा दाखल केला नव्हता.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या रंजना गवांदे यांनी याबाबत मात्र पाठपुरावा करून संबंधित प्रकरणाचे पुरावे जिल्हा आरोग्य विभागाला दिल्यानंतर 26 जून रोजी संगमनेर कोर्टात जिल्हा आरोग्य प्रशासनाने इंदोरीकर महाराज यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. त्या प्रकरणी संगमनेर कोर्टाने इंदोरीकर महाराज यांना समन्स बजावले असून कोर्टात हजर राहण्याचा आदेश दिलेला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button